Tiger 3 वरील चाहत्यांच्या प्रेमाने भारावला इम्रान हाश्मी, म्हणाला मला एका खलनायकाच्या भूमिकेत…

Tiger 3 वरील चाहत्यांच्या प्रेमाने भारावला इम्रान हाश्मी, म्हणाला मला एका खलनायकाच्या भूमिकेत…

Tiger 3 : टायगर 3 (Tiger 3) मधील इम्रान हाश्मीच्या अँटी-हिरो अभिनयासाठी त्याला पुन्हा अतुलनीय प्रेम आणि प्रशंसा मिळत असल्याबद्दल त्याला अत्यंत आनंद झाला आहे. YRF स्पाय युनिव्हर्सचा हिट थिएटरिकल चित्रपट 7 जानेवारी रोजी स्ट्रीमिंगवर प्रदर्शित झाला असून, इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे. प्रेक्षकांना अत्यंत अनोखा आणि जीवघेणा खलनायक दिल्याबद्दल इम्रानचे कौतुक केले जात आहे.

The Archies फेम अदिती सहगल म्हणते, ‘मी नशीबवान आहे की, सोशल मीडिया…

यावर इम्रान म्हणाला, ‘एखादा चित्रपट तुम्हाला पुन्हा पुन्हा दाद आणि आदर देत असतो. तेव्हा हे खरोखरच खास असते. म्हणजे चित्रपटाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. टायगर 3 मध्ये अँटी हिरोच्या भूमिकेत इतके प्रेम मिळणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मला एका खलनायकाच्या भूमिकेत पसंत केले गेले. जो जितका हुशार आणि धूर्त आहे. तितकाच सामर्थ्यशाली टायगर सारख्या प्रतिष्ठित नायकाला हाताशी धरून लढा देण्यास सक्षम आहे. आदित्य चोप्रा आणि मनीश शर्मा यांनी माझ्यासोबत आणि त्याला स्वतःचे बनवण्यासाठी माझ्यासाठी एक अतिशय अनोखा अँटी-हिरो आर्किटाइप तयार केला आहे.

जाहीर पाठिंबा देतो, नार्वेकरांना हाकला; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

इम्रान पुढे म्हणतो, टायगर 3 जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपट खूप हिट झाला. तेव्हा प्रेक्षकांनी मला प्रेम दिले. याचा मला आनंद आहे. आता, जेव्हा टायगर 3 स्ट्रीमिंगवर रिलीज झाला. तेव्हा ते पुन्हा माझ्यावर प्रेम करत आहेत. हा चित्रपट आणि त्याची कथा आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडले गेले आहेत. याची साक्ष आहे.

तसेच सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. जो भारतातील सर्वात मोठा चित्रपट IP आहे. YRF च्या स्पाई युनिव्हर्समधील सर्व चित्रपट – एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि टायगर 3 – ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज