‘रोमान्स करायला वय…’ Avneet Kaur सोबतच्या लिपलॉकवर नवाजुद्दीनचा मोठा खुलासा

‘रोमान्स करायला वय…’ Avneet Kaur सोबतच्या लिपलॉकवर नवाजुद्दीनचा मोठा खुलासा

Tiku Weds Sheru: ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये 49 वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) 21 वर्षीय अवनीत कौरसोबत (Avneet Kaur) लिप लॉक केल्याने सर्वांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. 28 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर रोमान्स केल्यामुळे चाहत्यांना नवाजुद्दीनवर जोरदार टीका होत आहे. आता अभिनेत्याने यावर स्वतःचा बचाव करत चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी अवनीत कौरसोबत दिसणार आहे. या दोन्ही कलाकारांच्या वयात जवळपास 25 वर्षांचा फरक आहे. ट्रेलरमध्ये दोघांमधील किसिंग सीन पाहून चाहते निराश झाले होते, ज्यावर बरीच टीकाही झाली होती. शूटिंग सुरू होण्याअगोदर गेल्या वर्षी या जोडीची अधिकृत घोषणा झाली, तेव्हाही त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता एका मुलाखतीमध्ये, नवाजुद्दीन सिद्दीकीने या किसिंग सीनवर मोठा खुलासा केला आहे.

याविषयी बोलताना  नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, ‘यावरून इतका वाद का? लोकांना नेमका काय प्रॉब्लेम आहे?’ पुढे तो म्हणाला, ‘रोमान्सला वयाचं बंधन नसतं. तरुणांमध्ये रोमान्स शिल्लक राहिलेला नाही, ही समस्या आहे. मला वाटत की तरुणांना आता रोमान्स करण्यात काही विशेष वाटत नाही. आम्ही त्या काळातील आहोत जेव्हा रोमान्सची गोष्ट काही वेगळीच होती. त्याची आता तुलना होऊ शकत नाही. आपण नेहमीच प्रेम करत राहू. आजही किंग खान सिनेमामध्ये रोमँटिक भूमिका करत आहे, कारण तरुण पिढी ते करू शकत नाही. त्यांना रोमान्स माहीत नाही.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाला, ‘आजकाल सर्व काही व्हॉट्सअॅपवर होते, मग ते प्रेम असो किंवा ब्रेकअप. यामागे एक कारण आहे. रोमान्स जगलेले लोक रोमान्स करू शकतात, दुसऱ्याला ते नाही जमणार. ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये  अवनीत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सिनेमात लग्न करतात आणि ट्विस्ट आणि टर्नसह दोघेही प्रेमात पडतात. अशा परिस्थितीत, सिनेमात दोघांमध्ये रोमँटिक सीक्वेन्स आहेत, ज्याला नेटिझन्स त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. पण आता हा सिनेमा नेमकं कसा असेल हे बघण्याची देखील चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube