Gulabi Title Song : ‘गुलाबी’चे टायटल साँग रिलीज अन् सोशल मीडियावर तुफान क्रेझ

  • Written By: Published:
Gulabi Title Song : ‘गुलाबी’चे टायटल साँग रिलीज अन् सोशल मीडियावर तुफान क्रेझ

Gulabi Title Song : जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल दाखवणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ (Gulabi) या चित्रपटाचे टायटल साँग नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या साँगला जबरदस्त रीस्पॉस मिळत आहे.

या चित्रपटामध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टायटल साँगला साई – पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे साँग हंसिका अय्यर यांनी गायले आहे. टायटल साँग मधून मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

टायटल साँग ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच या गाण्याचे सादरीकरणही कमाल आहे. या साँगमध्ये तिघींची बहरत जाणारी मैत्री दिसत आहे तसेच जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही या साँगमध्ये दाखवण्यात आले आहे. तीन मैत्रिणींच्या जीवनातील अनोख्या प्रवासाची एक झलक या साँगमधून दिसून येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पिंक सिटीमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळतील. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलं जाईल.”

22 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शक आहे. व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.

CM शिंदेंना बालेकिल्ल्यात आव्हान देणारे केदार दिघे आहे तरी कोण, जाणून घ्या सर्वकाही …

follow us
  • fb
  • instagram
  • youtube