The Fix चा ट्रेलर रिलीज; लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी एकत्र
The Fix : लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी हॉलिवूड गुप्तहेर-अॅक्शन थ्रिलर “द फिक्स” चा ट्रेलर
The Fix : लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी हॉलिवूड गुप्तहेर-अॅक्शन थ्रिलर “द फिक्स” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून गाय मोशे दिग्दर्शित हा चित्रपट यापूर्वी हॉटेल तेहरान या नावाने ओळखला जात होता. हा चित्रपट सीआयएच्या अशा एका पथकाची कथा सांगतो जे अफगाणिस्तानातील एका शोकांत मोहिमेच्या आठवणींनी अजूनही पछाडलेले आहे. नीसन यांच्या अनुभवी एजंट लॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लेव्ही यांच्या टकर या पात्राच्या नेतृत्वाखाली हे पथक तेहरानमधील एका धोकादायक मोहिमेत ओढले जाते. या मोहिमेत धाडसी सुटका आणि स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी दडलेली असते.
एलनाझ झारा या चित्रपटातील प्रमुख महिला पात्राची भूमिका साकारत आहे जिचा प्रवास या उलगडत जाणाऱ्या मोहिमेशी अतिशय जवळून जोडला जातो. ट्रेलरभर तिची ठळक उपस्थिती तिला नीसन आणि लेव्ही यांच्यासोबत धोक्याच्या केंद्रस्थानी उभी करते. तिच्या पात्राच्या झलकांवरून ही भूमिका शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि भावनिकदृष्ट्या तीव्र असल्याचे दिसून येते.
या चित्रपटात टायटस वेलिव्हर, नविद नेगहबान, वेस चॅथम आणि क्विन्सी आयझाया यांच्याही भूमिका आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी एलनाझची निवड या हॉलिवूड थ्रिलरशी होण एक आकर्षक नाते निर्माण करते. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निर्मितींमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर ती आता तिच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाच्या हॉलिवूड भूमिकेत दिसणार असून जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या दोन अभिनेत्यांसोबत एका मोठ्या थिएटर रिलीजमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हा चित्रपट तिच्या सातत्याने सीमापार विस्तारत गेलेल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. सेक्रेड गेम्स, मेड इन हेवन आणि आंतरराष्ट्रीय वेब शो तेहरान मधून ओळख मिळवल्यानंतर, एलनाझने जेरार्ड बटलरसोबत कंदहा मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. “द फिक्स” मुळे ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख अभिनेत्री म्हणून स्वतःहाची वेगळी ओळख संपादन करताना दिसते. इराणच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट इराणमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीकरिता विशेष महत्त्वाचा आहे, कारण तिचे स्वतःचे आयुष्य आणि कारकीर्द इराण, जर्मनी आणि भारत अशा तीन देशांमध्ये विस्तारलेली आहे. द फिक्स ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.