Download App

OMG 2 Trailer : ‘त्या’ प्रकरणात पंकज त्रिपाठीच्या मदतीला धावणार अक्षय; ‘ओह माय गॉड 2’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

OMG 2 Trailer Out : 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता. या यशस्वी चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘ओह माय गॉड’ मध्ये अक्षयने भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता ‘ओह माय गॉड 2’ मध्ये तो भगवान शिवाच्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकती लागलेली असताना या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Trailer Out of Akshay Kumars Upcoming Film OMG 2 )

>त्रिशूळ सरकार, पण माहुत त्रिशुळानेच हत्तीवर अंकुश ठेवतो; वडेट्टीवारांचं अभिनंदन अन् जाधवांची फटकेबाजी

काय आहे या ट्रेलरमध्ये ?
यामध्ये मुख्य भूमिकेतील पंकज त्रिपाठी एक वकील आहे. तर त्याच्या मुलाच्या एका आक्षेपार्ह व्हिडीओवरून त्याची शाळा त्याला काढून टाकते. त्यावर पंकज त्रिपाठी शाळेविरूद्ध पण ‘कांतीसरन मुदगल वर्सेस कांतीसरन मुदगल’ अशी केस लढताना दाखवला आहे. त्यात तोशिव भक्त असल्याने भगवान शिवाची मदर मागितली असता. भगवान शिव त्याच्या मदतीसाठी अक्षय कुमारला पाठवतात. त्यात आता अक्षय कुमार पंकज त्रिपाठीला या प्रकारणातील कसं बाहेर काढतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे.

दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी 2 ऑगस्टला येणार होता. मात्र सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यावर अभिनेता अक्षय कुमारने दुःख व्यक्त करत त्याच्या आगामी चित्रपट ‘ओएमजी 2’ चा ट्रेलर लॉन्च रद्द केले होते. मात्र काल ऐवजी हा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. याबद्दल अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारसह यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 ला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट भारतात सेक्स एज्युकेशनच्या अभावाच्या विरोधात आहे. तर अश्विन वर्दे, वायकॉम 18, आणि Jio स्टुडिओ यांनी या चित्रपटाचं प्रोडक्शन केले आहे.

Tags

follow us