Download App

A Haunting In Venice : हॉलिवूडच्या थरारक ‘ए हॉन्टिंग इन व्हेनिस’चा ट्रेलर रिलीज; या दिवशी येणार चित्रपट

A Haunting In Venice : प्रसिद्ध इंग्रजी लेखिका आगाथा क्रिस्टी यांच्या हॅलोवीन पार्टी या कादंबरीवर चित्रपट येत आहे. ऑस्कर विजेते दिग्दर्शक केनेथ ब्रानघ हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘ए हॉन्टिंग इन व्हेनिस’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा थरारक ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ( Trailer Release of Hollywood’s Thriller Movie A Haunting In Venice )

सीमा हैदर अन् सचिनच्या ‘सीमापार’ लव्हस्टोरीचा दी एन्ड? यूपी पोलिसांची मोठी माहिती

या चित्रपटाचं दिग्दर्शन ऑस्कर विजेते दिग्दर्शक केनेथ ब्रानघ हे करणार आहेत. तसेच यामध्ये केनेथ ब्रानघ यांनीच मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. हरक्यूल पोयरोट असं त्यांच्या पात्राचं नाव आहे. केनेथ ब्रानघ यांच्यासह या चित्रपटामध्ये काईल एलन, केमिली कॉटिन, जेमी डॉर्नन, टीना फे, जूड हिल, अली खान, एम्मा लॉर्ड, केली रेली, रिकॉर्डो स्कॅमरसियो यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?

हा चित्रपट प्रसिद्ध इंग्रजी लेखिका आगाथा क्रिस्टी यांच्या हॅलोवीन पार्टी या कादंबरीवर आधारित आहे. जसं कादंबरीमध्ये गुप्तहेर हरक्यूल पोयरोट भयानक रहस्याचा शोध घेतला जात आहे. त्याप्रमाणे चित्रपटात देखील सेवानिवृत्त गुप्तहेर हरक्यूल पोयरोट परत आले आहेत. एका भयानक रहस्याचा शोध घेतला जात आहे. एका पार्टीमध्ये हत्या होते. त्याचा शोध घेताना पोयरोट रहस्यांच्या दुनियेत पोहचतो.

यामध्ये 2017 ला आलेला मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस आणि 2022 च्या डेथ ऑन द नाईल याचित्रपटांच्या निर्मात्यांना एकत्र आणलं आहे. कारण केनेथ ब्रानघसह जूडी हॉफलुंड, रिडले स्कॉट आणि सायमन किनबर्ग चित्रपटाचे निर्माते आहेत. तर लुईस किलिन, जेम्स प्राइसहार्ड आणि मार्क गॉर्डन कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट 15 सप्टेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tags

follow us