वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिता खरातचा रॅपर लूक समोर
येत्या 20 फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Vanita Kharat’s rapper look, which won the hearts of the audience, is out : प्रसिद्ध चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘रॅपर लूक’ नुकताच समोर आला आहे. तिचा हा रॅपर स्वॅग आगामी ‘जब्राट’ या मराठी चित्रपटातील आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोक काय म्हणतील सोचने का नाय !
मनासारखं जगायचं डरने का नाय !
पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह पोस्ट मोठ्या आणि संघटित कटाचा भाग?; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात धाव
असं सांगत जगण्याचा फुल ऑन आनंद घ्या असं या रॅप मधून वनिताने सांगितलं आहे. कॉलेज भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाच्या मनाशी जपलेला असतो. कॉलेज लाइफमध्ये धम्माल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध आणि धमाल,मस्ती, कल्ला याची झलक या गाण्यात पहायला मिळते आहे. प्रगती कोळगे यांनी लिहिलेलं हे रॅप गाणं राजनंदिनी मगर, प्रगती कोळगे, स्वाती शिंदे , शिवानी देशपांडे यांनी गायलं आहे. डॉ.जयभीम शिंदे यांचं संगीत आहे.
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे.
