Varun Dhavan वडीलांसह पुन्हा धमाल करण्यास सज्ज; नव्या चित्रपटाची केली घोषणा

Varun Dhavan वडीलांसह पुन्हा धमाल करण्यास सज्ज; नव्या चित्रपटाची केली घोषणा

Varun Dhavan will see with father David Dhawan : अभिनेता वरून धवन ( Varun Dhavan ) गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट मूव्ही बेबी जॉनसाठी चर्चेत आहे. हा चित्रपट यंदा रिलीज होणार आहे. त्याचबरोबर वरूनचा अनिस बज्मी यांच्यासोबत असलेला नो एंट्री टू या चित्रपटाच्या देखील लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे. ज्यामध्ये तो त्याचे वडील डेव्हिड धवन ( David Dhawan ) यांच्यासोबत पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Politics : MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?

मैं तेरा हिरो, जुडवा टू आणि कुली नंबर वन या तीन चित्रपटांनंतर वरून पुन्हा एकदा वडील डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा हा वडिलांसोबतचा चौथा चित्रपट असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही.

शिंदे मुंबईत धुरळा उडवणार! मराठमोळ्या कलाकारांची पॉलिटक्समध्ये एन्ट्री; कुणाचं नाव चर्चेत?

धवन पिता पुत्रांचा हा नवा प्रोजेक्ट टिप्स फिल्म यांच्या सोबत असणार आहे. याबद्दल माहिती देताना निर्मात्यांकडून सांगण्यात आलं की, वरून धवन आणि डेव्हिड धवन यांच्याकडून नव्या चित्रपटासाठी टिप्स सोबत करार करण्यात आला आहे. हा चित्रपट रमेश तौराना हे निर्माण करणार आहेत. तर पुढील वर्षी 2 ऑक्टोबर 2025 ला गांधी जयंतीच्या निमित्ताने हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube