ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी अन् वंदना गुप्ते यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी अन् वंदना गुप्ते यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव जाहीर

Natya Parishad Jeevangaurav: १४ जून गोविंद बल्लाळ स्मृतीदिन व पारितोषिक वितरण सोहळा अखिल भारतीय नाट्य परिषद दरवर्षी आयोजित करत असते. (Natya Parishad Jeevangaurav) परंतु मागील ४ वर्षात कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत. यंदाच्या वर्षी १४ जूनचा कार्यक्रम नुतनीकरण केलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात (Yashwantrao Chavan Theater) दिमाखात साजरा होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)


यंदाचा जीवनगौरव पुरस्कार नाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Actor Mohan Joshi) व जेष्ठ अभिनेत्री श्रीमती वंदना गुप्ते (Actress Vandana Gupte) यांना जाहीर करण्यात आला आहे. मोहन जोशी हे रंगभूमीवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. अनेक नाटकांमधून आजपर्यंत सक्रीयपणे ते भूमिका करत आहेत. हिंदी, मराठी, भोजपुरी व अनेक भाषेतून त्यांनी ४५० पेक्षाही अधिक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहे.

भारत सरकारचा नाट्य कला अकादमी पुरस्कार जोशी यांना मिळाला आहे. मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून १३ वर्ष काम पाहिले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरू झाले. नाट्य परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी रंगभूमीवर अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी भाषेतून नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तसेच अखील भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या २००४ ते २०१३ या काळात कोषाध्यक्षा म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. १०० वे नाट्य संमेलनाच्या बाबत लवकरच नियोजन आखण्यात येणार आहे. हे संमेलन नाट्य कलावंत व नाट्य रसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube