Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन
Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन झालं आहे. (Vaishali Shinde ) वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वैशाली यांना मधुमेह झाल्याची माहिती समोर आली आहे. मधुमेहाने ग्रस्त असताना त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये गँगरीन उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं आहे .
वैशाली शिंदे यांचा जन्म 4 एप्रिल 1962 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अतिदुर्गम गावात झाला. त्यांचे वडील रामचंद्र क्षीरसागर आणि आई सरुबाई क्षीरसागर दोघेही मोलमजूरी करत आपले घर भागवायचे. रामचंद्र क्षीरसागर हे कडिया कामगार होते. वैशाली शिंदे यांचं नाव दया होतं. मात्र, प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्या दया क्षीरसागरच्या वैशाली शिंदे झाल्या.
वैशाली यांच्या आई-वडिलांचा आवाज मधूर होता. ते घरात बुद्ध-भीम गाणे गायचे. वडील ढोलकी देखील वाजवायचे. त्यामुळे वैशाली यांचा कान लहानपणापासूनच तयार झाला होता. कालांतराने क्षीरसागर कुटुंब कामाच्या शोधात पुण्यातील चिंचवड गावात आलं. त्यानंतर काही वर्षाने क्षीरसागर कुटुंब पिंपरीमध्ये स्थायिक झालं. त्यांच्या शेजारी मच्छिंद्र कांबळे मामा राहायचे. कांबळेंची गायन पार्टी होती. त्यांच्या घरात गाण्याची मैफल रंगायची. तेव्हा वैशाली या छोटी बहीण कल्याणीला घेऊन कार्यक्रम ऐकायच्या. ताईच कधी कधी कांबळे मामांच्या गायन पार्टीत गायच्याही. त्यावेळी पैसे मिळायचे नाहीत. त्या केवळ हौसेखातर गात असायच्या.
Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन
वैशालीताई पुण्याहून मुंबईत आल्या तेव्हा त्यांची पहिली भेट कवी लक्ष्मण राजगुरु यांच्याशी झाली. लक्ष्मण राजगुरु अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी वैशालीताईंना गाण्यातील काही बारकावे देखील शिकवले. यामुळे गायिका म्हणून त्या चांगल्याच तयार झाल्या. राजगुरु यांनी गायिका म्हणून तयार केल्याने त्यांनी गुरु मानले.
राजगुरु त्यांना प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जात असत, समाजाची गायिका म्हणून त्यांची ओळख करून देत. वैशालीताईंचा आवाज, त्यांची गाणी लोकांनी ऐकावी असं त्यांना वाटायचं. त्यासाठीच राजगुरुंचा हा कायम प्रयत्न असायचा. परंतु, असं असलं तरी आपला आवाज हा नैसर्गिक आहे. कुणीही आपल्याला ताल, सूर शिकवला नाही, असं त्या नेमही सांगत असायच्या.