गुड न्यूज ! विकी कौशल आणि कतरिना कैफ झाले आई-बाबा; घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Vicky Kaushal Katrina Kaif Blessed With baby Boy : बॉलिवूडमधील स्टार अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफने चाहत्यांशी एक

  • Written By: Published:
Vicky Kaushal Katrina Kaif

Vicky Kaushal Katrina Kaif Blessed With baby Boy : बॉलिवूडमधील स्टार अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफने चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली आहे. कतरिना आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सध्या दोघांवर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) पोस्ट शेअर करत लिहिले की, आमच्या घरी आम्ही आमच्या बाळाचे स्वागत करतो… 7 नोव्हेंबर 2025 . कतरिना आणि विकी. यावर प्रतिक्रिया देत करिना लिहिते, “कॅट… मुलाच्या आई क्लबमध्ये स्वागत आहे. तुझ्या आणि विकीसाठी खूप आनंद झाला.” प्रियांका चोप्राने लिहिले, “तुमच्या दोघांसाठी खूप आनंद झाला, अभिनंदन.” तर आयुष्मान खुराना लिहिले, “सर्वात चांगली बातमी… तुम्हा दोघांचे अभिनंदन.”

सप्टेंबरमध्ये गरोदरपणाची घोषणा

23 सप्टेंबर रोजी, विकी आणि कतरिना लवकरच पालक होणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी लिहिले की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय होता. काही दिवसांपूर्वी, वडील होण्यापूर्वी, विकी एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी खूप उत्साहित आहे आणि हा एक मोठा आशीर्वाद आहे. हा एक रोमांचक काळ आहे.

धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

विकी आणि कतरिनाने अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 2021 मध्ये लग्न केले. ते चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. बऱ्याच काळापासून कतरिनाच्या गरोदरपणाच्या अफवा होत्या, परंतु त्यांनी ते गुपित ठेवले आणि नंतर सप्टेंबरमध्ये ही आनंदाची बातमी दिली.

follow us