गावच्या मातीतून थेट कलेक्टरच्या खुर्चीवर! ‘बंधू’मध्ये विठ्ठल काळे साकारणार दमदार भूमिका

आपल्या अभिनयाची ताकद दाखवत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विठ्ठल काळेने आता चक्क कलेक्टर बनण्याची वाट चोखाळली आहे!

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 05T141725.605

Vitthal Kale to play a powerful role in ‘Bandhu’ : गावाकडच्या मातीतून आलेल्या विठ्ठल काळेने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शॉर्ट फिल्म्सपासून मराठी आणि हिंदी चित्रपटांपर्यंत तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विठ्ठलने देव पटेल, नागराज मंजुळे, अनुपम खेर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. भूमिका छोटी असो वा मोठी आपल्या अभिनयाची ताकद दाखवत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विठ्ठल काळेने आता चक्क कलेक्टर बनण्याची वाट चोखाळली आहे! हे वाचून क्षणभर प्रश्न पडेल, ‘अभिनय सोडून विठ्ठल कलेक्टर कधी झाला? पण थांबा… हा बदल खऱ्या आयुष्यातला नसून, आगामी ‘बंधू’ चित्रपटातील त्याच्या नव्या भूमिकेचा आहे.

येत्या 20 नोव्हेंबरला ‘बंधू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.

रोहित पवार नव्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात? भाजप नेत्याचा मोठा दावा

‘बंधू’मध्ये विठ्ठल काळे कलेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. कर्तव्याची जबाबदारी आणि नात्यांची भावनिक गुंतागुंत या दोन्हींचा सुरेख मेळ त्याच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एका बाजूला कलेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडणारा अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला नात्यांच्या भावविश्वात गुंतलेला माणूस अशा दोन वेगवेगळ्या छटा विठ्ठलच्या भूमिकेतून उलगडणार आहेत.

याबाबत बोलताना विठ्ठल काळे सांगतात,‘बंधू’ मधील कलेक्टरची भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. अधिकारासोबत नात्यांची भावनिक बाजू साकारणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.’ माझ्या व्यक्तिरेखेच्या नजरेतून ‘बंधू’ची कथा आणि त्यातील नात्यांचे अनेक पदर प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत, याचा मला विशेष आनंद आहे.

follow us