जगण्याच्या संघर्षापासून आत्मविश्वासापर्यंत – महिला आणि सामर्थ्याबद्दल कृष्णा श्रॉफचा काय म्हणाली !
MMA Matrixच्या सह-संस्थापक कृष्णा श्रॉफ हिला वाटत की यावर चर्चा करण्यापेक्षा लहान वयापासूनच मुलींना स्त्री सामर्थ्याचे धडे दिले पाहिजे.
What did Krishna Shroff say? : महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या चर्चा अनेकदा होत असतात त्यात दुर्दैवी घटनांनंतर त्या अधिक जोर धरतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर दिला जातो. मात्र, फिटनेस उद्योजिका आणि MMA Matrixच्या सह-संस्थापक कृष्णा श्रॉफ हिला वाटत की यावर चर्चा करण्यापेक्षा लहान वयापासूनच मुलींना स्त्री सामर्थ्याचे धडे दिले पाहिजे.
अलिकडच्या वर्षांत भारतातील महिलांमध्ये कॉम्बॅट स्पोर्ट्सची लोकप्रियता सातत्याने वाढली आहे. Sports & Fitness Industry Associationच्या मत जगभरात महिलांचा स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि मार्शल आर्ट्समधील सहभाग सातत्याने वाढत आहे. आज अधिकाधिक महिला बॉक्सिंग, मिक्स्ड मार्शल आर्ट्स आणि ब्राझिलियन जिउ-जित्सूसारख्या गोष्टी शिकत असून त्यांचा आत्मविश्वास यातून वाढताना दिसतोय.
MMA Matrixच्या माध्यमातून अनेक वर्षे कॉम्बॅट स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणाऱ्या कृष्णासाठी हा बदल सकारात्मक आहे ती सांगते “आपण महिलांना केवळ कसे जगायचे हे शिकवणे थांबवले पाहिजे त्यांना स्वतःला सामर्थ्यवान कसे वाटेल हे शिकवले पाहिजे. सामर्थ्य म्हणजे केवळ कठीण परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करणे नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने वावरणे”
टाटा समूहात महत्त्वाची घडामोड; एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदावरून पायउतार, एस. पद्मनाभन यांची नियुक्ती
कृष्णाचा विश्वास आहे की तरुण मुलींना लहान वयातच कॉम्बॅट स्पोर्ट्सची ओळख करून दिल्यास त्याचे फायदे शारीरिक फायदे होतील. मार्शल आर्ट्सच्या माध्यमातून विकसित होणारी शिस्त, एकाग्रता आणि मानसिक लवचिकता दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते मग ते शिक्षण असो, करिअर असो किंवा वैयक्तिक नातेसंबंध.
देशभरात महिला सक्षमीकरणाबाबतच्या चर्चा अधिक व्यापक होत असताना मुलींना कोणताही संकोच न बाळगता आपले सामर्थ्य स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणारे वातावरण निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित व्हावे अशी कृष्णाची अपेक्षा आहे.