Download App

Women Day: चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या महिला निर्मात्या माहितीय का?

Women Day Special: जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women’s Day) अनेक खास उपक्रम बऱ्याच जणांकडून राबवण्यात आले. बॉलीवूडसारख्या (Bollywood) पुरुषप्रधान उद्योगात पाय रोवणे म्हणजे केक वॉक नक्कीच नाही, पण गुनीत मोंगा, मीरा नायर, प्रेरणा अरोरा, अश्विनी अय्यर तिवारी आणि झोया अख्तर या चित्रपट निर्मात्यांनी हे सिद्ध केले आहे. प्रत्येकासाठी चित्रपट विश्वात स्वतःच अस्तित्व निर्माण केले आहे.

मीरा नायर (Meera Nair): मीरा नायरला हिला परिचयाची गरज नाही या चित्रपट निर्मात्या पहिल्या काही महिला चित्रपट निर्मात्यांपैकी एक होत्या, ज्यांनी भारताला जागतिक पातळीवर नेऊन पोहचवल आहे. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये सलाम बॉम्बे, गोल्डन ग्लोब विजेता हिस्टेरिकल ब्लाइंडनेस, व्हॅनिटी फेअर, द नेमसेक, द रिलकंट फंडामेंटलिस्ट आणि ‘द सुटेबल बॉय’ या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे.

गुनीत मोंगा (Gunit Monga): चित्रपट निर्मात्याच्या प्रवासात या स्त्रीने अनेकदा अपारंपरिक चित्रपटांना वेगळा दर्जा निर्माण करून दिला आहे. गेल्या वर्षी तिने ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी अकादमी पुरस्कार मिळवून भारताचा गौरव केला. गेल्या काही वर्षांत, गुनीतने ‘पेडलर्स’ (2012), ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फ्रँचायझी, ‘कथाल’ आणि बरेच काही उत्कृष्ठ प्रोजेक्ट्स केले आहेत.

प्रेरणा अरोरा (Prerna Arora): चाहते बॉक्स ऑफिस नंबर्सचा पाठलाग करत होते आणि त्याच जुन्या कथांसह कंटाळवाणेपणाच्या जाळ्यात अडकत होते, तेव्हा प्रेरणा अरोरा यांनी सामाजिक समस्या असलेल्या चित्रपटांना न्याय दिला. तिच्याकडे ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ (2017), ‘रुस्तम’ (2016), पॅडमॅन (2018) आणि ‘परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण (2018) सारखे चित्रपट तिने केले आहेत. आता हा डायनॅमिक चित्रपट निर्माता दोन आगामी प्रकल्पांसाठी तयारी करत आहे. दिव्या खोसला कुमार अभिनीत ‘हिरो हिरोईन’ आणि निधी अग्रवाल अभिनीत ‘डंक’ जे भूमाफियांच्या समस्येवर प्रकाश टाकले आहे.

Dhanush: रॉकस्टार डीएसपीने धनुषच्या ‘कुबेरा’चा फर्स्ट लूक केला रिलीज, चाहते म्हणाले…

अश्विनी अय्यर तिवारी (Ashwini Iyer Tiwari): अश्विनीच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की तिचे चित्रपट स्त्रियांच्या दृष्टिकोनातून कसे आहेत, जे चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात फारच दुर्मिळ आहे. कॉमेडी-ड्रामा निल बट्टे सन्नाटा (2016) या तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणानंतर ती सर्वात जास्त मागणी असलेली दिग्दर्शक बनली. तिने रोमँटिक कॉमेडी-ड्रामा बरेली की बर्फी (2017) साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

झोया अख्तर (Zoya Akhtar): 2009 मध्ये झोयाने ‘लक बाय चान्स’मधून पदार्पण केले, तेव्हा ती एक चित्रपट निर्माती बनली. ‘जिंदगी ना मिलेंगी दोबारा’ या तिच्या दुसऱ्या चित्रपटाद्वारे तिने व्यावसायिक यशाची चव चाखली, ज्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. विविध प्रकल्पांमधून तिने कायम प्रेक्षकांना आपलस केलं आहे.

follow us