हगवणे कुटुंबियांचा अंडरवर्ल्डशी संबंध धमकावत पैसै थकवलेल्या दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा

हगवणे कुटुंबियांचा अंडरवर्ल्डशी संबंध धमकावत पैसै थकवलेल्या दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा

Hagavane family also looted the film industry; Threatened the director not give money : सध्या राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज काही ना काही अपडेट येत आहेत. त्याचबरोबर हगवणे कुटुंबाने केलेल्या वेगवेगळ्या कारनाम्यांची देखील प्रकरणं या निमित्ताने समोर येत आहेत. त्यात आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. त्यानुसार हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट क्षेत्रामध्ये देखील असा दिग्दर्शकाला गंडा घातला आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण अटक; वाचा, कसा दिला पोलिसांना चकवा?, कुठं होता फरार?

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे हिचे सासरे असलेले राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणेने खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अविनाश खोचरे पाटील. खोचरे यांनी आरोप केले आहेत की, संतोष हगवणे यांनी त्यांचे लाख रुपये थकवले आहेत. त्याचबरोबर आपल्याला धमकी दिली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती. तसेच पुणे पोलीस आयुक्तालयात देखील तक्रार केली होती. या चित्रपटाचे पोस्टर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं.

त्याचबरोबर या दिग्दर्शकाचं नावं देखल चित्रपटाला दिलं नाही. तसेच त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांनी तशीच धमकी मला दिली होती. ते म्हणाले होते की, आम्ही तुला कोर्टामध्ये सडवणार असं म्हणत धमकी दिल्याचं या दिग्दर्शकाने सांगत धक्कादायक माहिती दिली आहे.

हगवणे बंधूंचे आणखी काही कारनामे…

आता हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढू लागल्या आहेत. शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध आणखी एका व्यक्तीने तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. खेड तालुक्यातील निगोजे येथील प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या वैभव सुर्यवंशीच्या पाठीवर कौतुकाची थाप! पाहा खास फोटो…

याबाबत अधिक माहिती अशी, प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाखांचा जेसीबी विकत घेतला होता. हा व्यवहार मार्च 2022 मध्ये झाला होता. येळवंडे यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. या जेसीबीवर बँकेचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासठी येळवंडे यांनी दर महिन्याला हगवणे यांनी 50 हजार रुपये देण्याचेही ठरले होते. यानुसार कर्जाचे हप्ते भरण्यासाठी लता हगवणे यांच्या बँक खात्यात 6 लाख 70 हजार रुपये जमा करण्यात आले होते.

Maruti Suzuki देणार Tata ला धक्का; बाजारात लॉन्च करणार ‘ह्या’ कार्स

परंतु, त्यांनी बँकेचे हप्ते न भरता ही रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकेने ऑगस्ट 2024 मध्ये प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबीचा ताबा घेतला होता. यानंतर हगवणेंनी हा जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला. पण प्रशांत येळवंडेंना दिला नाही. स्वतःकडेच ठेऊन घेतला. त्यामुळे जेसीबीसाठी दिलेले 11 लाख 70 हजार रुपये परत द्यावेत नाहीतर जेसीबीचा ताबा द्या अशी मागणी येळवंडेंनी केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे किंवा जेसीबी यातील काहीच मिळालं नाही म्हणून येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याची माहिती मिळाली आहे.

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक, माजी मंत्री राजेश टोपे यांचं प्रतिपादन

पिस्तुलाचा परवाना मिळवताना आपण पुण्यातील रहिवासी असल्याचे पत्ते हगवणे बंधुंनी दिले होते. पुणे पोलीस आयु्क्तालयातून पिस्तूल परवाना कसा घेतला? विशेष म्हणजे एकाच दिवशी परवाने आले होते. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवले म्हणून हगवणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube