Zareen Khan दिसणार पंचायत 3 मध्ये? रॉ भूमिका करण्याची व्यक्त केली इच्छा!

Zareen Khan दिसणार पंचायत 3 मध्ये? रॉ भूमिका करण्याची व्यक्त केली इच्छा!

Zareen Khan wants to be part of Panchayat 3 : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) कायम उत्तम भूमिकांच्या शोधात असते. नुकतच तिने ‘पंचायत 3’ (Panchayat 3) ही वेब सिरीज पाहिली. ती बघून तिला सुद्धा अशा वेब सीरिजचा भाग व्हायला आवडेल. अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सीझनसाठी अभिनेत्रीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे कौतुक केले.

NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा

झरीन म्हणाली, “पंचायत सारखा शो हा नेहमीच्या थ्रिलर, ॲक्शन प्रकारातून सुटलेला एक प्रकार आहे जो ओटीटी स्पेसवर वर्चस्व गाजवत आहे. मला आशा आहे की मी अशा वेब सीरिज चा भाग बनू शकते आणि अश्या रॉ भूमिका एक्सप्लोर करण्या ची माझी इच्छा आहे.” शोच्या निर्मात्यांनी तपशीलाकडे लक्ष दिल्याबद्दल आणि खेड्यातील जीवनाची मोहकता समोर आणल्याबद्दल अभिनेत्रीने त्यांचे कौतुक केले. तिची पोस्ट प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आली. कामाच्या आघाडीवर झरीनने मनोरंजक प्रकल्पांवर स्वाक्षरी केली आहे.

मी PMO कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार…सव्वा कोटींना गंडा, ‘घोटाळ’झेप घेणारी कश्मिरा पवार कोण?

या अगोदर देखील तिने अशी भावना व्यक्त केली होती. या बद्दल बोलताना ” केवळ आव्हानात्मकच नाही ( Challenging role ) तर प्रेक्षकांनाही आवडेल अश्या प्रोजेक्ट्स चा भाग बनण्यास मी उत्सुक आहे आणि स्क्रिप्ट्सचा एक भाग होण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे. जिथे मला माझ्या अभिनय क्षमतांचे प्रदर्शन करण्यास वाव आहे. मी नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे आणि मी नेहमीच माझ्या सीमा पार करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि मला विविध पात्रे एक्सप्लोर करायची आहेत.” अस सांगते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज