लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल

लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल

1 / 4

लोणावळा येथील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिलं. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

2 / 4

मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं होतं.

3 / 4

सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळं तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला.

4 / 4

सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे..

Tags

follow us