Ajit Pawar : अजितदादांच्या शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; पहा फोटो

अजितदादांच्या शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहा फोटो

  • Written By: Published:
1 / 7

अजितदादांच्या शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना भावनिक आठवणींना उजाळा

2 / 7

अजितदादांच्या शोकसभेला राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार तसंच पवार कुटुंबीय आणि सर्वपक्षीय नेतेमंडळी, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानीसह समाजातील विविध स्तरातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

3 / 7

सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करणारा नेता. विकासकाम पाहायची, तर बारामतीला येऊन पाहा, असं सागताना त्यांनी केवळ मतदारसंघच नव्हे, तर संपूर्ण राज्याची बांधणी केली. जयंत पाटील

4 / 7

आम्ही विधीमंडळात असताना आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. ते दिल्लीला आले की नेहमी मला आवर्जून भेटायचे. छोट्या-छोट्या बाबींपासून ते मोठ्या विकासकामांपर्यंत प्रत्येक गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

5 / 7

आपल्यापैकी कुणावरही अशी वेळ येईल, याची कल्पना नव्हती. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलोत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

6 / 7

साल 1991 पासून सक्रिय राजकारणात अनेक महत्त्वाची पदं अजितदादांनी भूषविली. दादा हे अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांनी आपली मतं नेहमीच परखडपणे मांडली. राज्याच्या विकासाचा ध्यास त्यांनी सतत कायम ठेवला होता. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री

7 / 7

दादांबद्दल प्रत्येकाच्या मनात अपार प्रेम आहे. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारे दादा आज मात्र असे अवेळी का निघून गेले? छगन भुजबळ

Tags

follow us