नगरमध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन, ‘विजेत्यास अर्धा किलो सोन्याची गदा’
सोन्याची गदा बक्षीस असणारी पहिली स्पर्धा
छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन
तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन स्पर्धेचे आयोजन
कुस्ती स्पर्धा २० ते २३ एप्रिल दरम्यान वाडीया पार्क मैदानावर रंगणार
विजेत्या मल्लास २४ कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे 35 लाख) देण्यात येणार
ही स्पर्धा माती व गादी विभागात ४८, ५७, ६१, ६५, ७०, ७४,७९,८६ किलो वजन गटात होत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत पार पडले.
कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रविवारी (२३ एप्रिल) रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या मल्लास सोन्याची गदा देण्यात येणार
