रिंकू राजगुरुचा मराठमोळा अंदाज; चाहते म्हणतात…

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या मराठमोळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असते.

रिंकू सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. मकर संक्रांती निमित्त रिंकूने तिचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या खास फोटोमध्ये रिंकू मराठमोळ्या साडीमध्ये दिसत आहे. रिंकूचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसत आहे.

तिच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "मराठी मातीची संस्कृती जपणारी मराठी मुलगी" अशी कमेंट एका युजर्सने केली आहे.
