महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहन, परेडचही संचलन

राज्यभरात आज ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर येथील कस्तुरचंद पार्क इथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र दिना निमित्त नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे आज सकाळी राष्ट्रध्वजवंदन आणि परेडचे संचलन करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी फडणवीस यांनी परेडचे संचलन करणाऱ्या चमूशी संवाद साधला. त्यांचे कौतूकही फडणवीसांनी केले.

यावेळी विविध पुरस्कार विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहन झाल्यानंतर फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अनेक उपक्रमांची, योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य राहिले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपला महाराष्ट्र आणखी प्रगतीशील करण्याचा, राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प आपण करूयात, असे आवाहन केले.

यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
