Sharad Pawar Retirement : पुस्तकांचं प्रकाशन, राजीनामा ते नेत्यांना अश्रू अनावर; आजच्या कार्यक्रमातील फोटो

  • Written By: Published:
1 / 13

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन झाले.

2 / 13

. या प्रकाशन कार्यक्रमाला स्वतः शरद पवार, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर अरुण गुजराती, हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

3 / 13

गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.

4 / 13

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडणार असल्याची घोषणा केली. पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली

5 / 13

शरद पवार यांच्या या घोषणेनंतर सभागृहात बसलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते आश्चर्यचकित झाले.

6 / 13

अनेक कार्यकर्ते शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी व्यासपीठावर आले.

7 / 13

अनेक नेते देखील शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांना विनंती करू लागले.

8 / 13

नेत्यांना देखील आपले अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील बोलताना कंठ दाटून आला.

9 / 13

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले. ते अगदी ढसाढसा रडले.

10 / 13

विधानसभेचे उपसभापती यांनी देखील राज्यातील सर्व समाजघटकातील लोकांना त्यांची गरज आहे , असं मत व्यक्त केलं.

11 / 13

. पण या सर्व नाट्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेने अजित पवार यांची भूमिका सर्वार्थाने वेगळी होती. सगळे नेते हे शरद पवार यांना राजीनामा घेण्याची विनंती करत असताना अजित पवारांचा सूर वेगळाच सांगत होता.

12 / 13

पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून प्रत्येक नेता आग्रह करत होता. कार्यकर्ते घोषणा देत होते. सुप्रिया सुळे शांत बसून होत्या. कधी हसत होत्या. पवार यांच्या शेजारी प्रतिभा पवार होत्या. त्या देखील कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि भाषणे ऐकून गालात हसत होत्या

13 / 13

सर्व कार्यकर्ते, नेते यांनी मागणी केल्यानंतरही शरद पवार काहीच न बोलता आपल्या घरी गेले. पण ते आपला निर्णय बदलणार का? असा प्रश्न आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube