न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

न्यूझीलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर आज सकाळी भूकंप (Earthquake) झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भुकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून 10 किलोमीटर आत होता. दरम्यान, भूकंपानंतर, USGS ने न्यूझीलंडमध्ये सुनामीचा इशारा जारी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या स्थानिक वेळेनुसार हा भुकंप 8.56 वाजता झाला. या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. तर भूंकपाचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर आत असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, साधारण 30 सेकदापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यानंतर नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पहायला मिळालं. न्यूझीलंड सरकारनंही परिस्थितीचं गांभीर्य आणि भूकंपाची तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरु करत अनेक पथकं पाठवली. मागील दोन दिवसांपासून न्यूझीलंडच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता आलेल्या भूकंपामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येतआहे.

15 फेब्रुवारीला 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला
फेब्रुवारी महिन्यातही न्यूझीलंडमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. वेलिंग्टनसह ऑकलंड आणि क्राइस्टचर्च शहरातील लोकांना साधारणता: तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू पॅरापरामु शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर होता. यानंतर थोड्यात वेळातच भूकंपाचा दुसरा धक्काही बसला. दुसरा धक्का हा 4.0 रिश्टर स्केलचा होता. या दुसऱ्या भुकंपाचं केंद्र हे नैऋत्येला टाउमारुनुई हे शहर होतं.

न्यूझीलंडमध्ये भूकंप वारंवार होत असतात. कारण न्यझीलंड हे 2 टेक्टोनिल प्लेट्सच्या जंक्शनजवळ आहे. न्यूझीलंड शिवाय, पापुआ न्यू गिनी, तैवान, वानुआतु आणि इतर अन्य पॅसिफिक बेटावर भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते.

कुस्ती रंगण्याआधीच वाद; पुणे की सांगली कुठे होणार महिला महाराष्ट्र केसरी ?

रिंग ऑफ फायर काय आहे?
द रिंग ऑफ फायर हे असे ठिकाण आहे, जिथे अनेक महाद्वीपीय तसेच महासागरी टेक्टोनिक प्लेट्स आहेत. जेव्हा कधी या प्लेट्स एकमेकांवर धडकतात, तेव्हा भूकंप होतो. त्सुनामी निर्माण होते आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. जगातील तब्बल नव्वद टक्के भूकंप हे याच रिंग ऑफ फायरच्या भागात होतात. हे क्षेत्र 40 हजार किलोमीटरमध्ये पसरले आहे. जगातील 75% सक्रिय ज्वालामुखी या प्रदेशात आहेत. या रिंग ऑफ फायरच्या अधिकारक्षेत्रात एकूण 15 देश आहेत.

दरवर्षी 20,000 भूकंप होतात
जगभरात दरवर्षी अनेक भूकंपाच्या घटना घडतात. मात्र, त्या भूकंपाची तीव्रता कमी असते. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र हे दरवर्षी 20,000 भूकंपांची नोंद करते. यापैकी 100 भूकंप असे आहेत की त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतो. इतिहासातील सगळ्यात जास्त काळ टिकणारा भूकंप हा सन 2004ला हिंदी महासागरात झाल्याची नोंद आहे. हा भूकंप तब्बल 10 मिनिटे चालला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube