तासाभरात सात खोटे दावे अन् ट्रम्प यांचा पुन्हा बॉम्ब हल्ल्याचा अल्टिमेटम; इराणचाही तगडा पलटवार
Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत केलेल्या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
Donald Trump On Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत केलेल्या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, इराणने हे सर्व दावे खोटे असल्याचे सांगत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. 8 एप्रिल रोजी स्वाक्षरी झालेला अमेरिका-इराण शस्त्रसंधी करार २२ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे.
Explainer : पनामा अन् सुएझला टोल वसुली मग, इराणला का नाही? समजून घ्या, सागरी कायद्यातील पेच
इराणची भूमिका काय?
इराणचे बागेर यांनी अमेरिकेचे दावे खोडून काढत म्हटले आहे की, ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण आपले समृद्ध युरेनियम (Enriched Uranium) अमेरिकेच्या हवाली करेल आणि हे साहित्य लवकरच अमेरिकेत आणले जाईल. त्यावर इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी स्पष्ट केले की, समृद्ध युरेनियम परदेशात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अमेरिकेला युरेनियम देणे हा इराणसाठी कधीच पर्याय नव्हता आणि नसेल.
होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz)
ट्रम्प यांनी बोलताना होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असल्याचाही दावा केला. यावर स्पष्टीकरण देताना इराणने सांगितले की, जोपर्यंत इराणवरील निर्बंध कायम आहेत, तोपर्यंत ही सामुद्रधुनी खुली राहणार नाही. जहाजांची वाहतूक ही इराणची मंजुरी आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून असेल, सोशल मीडियावरील विधानांवर नाही.
युद्धविरामाच्या अटींचे पालन आवश्यक
रॉयटर्सशी बोलताना एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणताही ठोस करार झालेला नाही. होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे हे अमेरिका युद्धविरामाच्या अटींचे किती गांभीर्याने पालन करते, यावर अवलंबून आहे.
ट्रम्प यांचा मोदींना फोन, होर्मुज खुली करण्यावर चर्चा झाली? ट्रम्प यांचा मोठा खुलासा…
…तर पुन्हा बॉम्ब हल्ले ट्रम्प यांचाअल्टिमेटम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर बुधवारपर्यंत इराणसोबत करार झाला नाही, तर अमेरिका पुन्हा बॉम्बहल्ला सुरू करू शकते. सध्याची शस्त्रसंधी वाढवला जाऊ शकते किंवा पूर्णपणे संपुष्टात आणली जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. फिनिक्सहून वॉशिंग्टनला परतत असताना एअर फोर्स वनमधून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले. ट्रम्प म्हणाले, “मी कदाचित शस्त्रसंधी वाढवणार नाही, पण इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी सुरूच राहील. तसे झाल्यास, आम्हाला पुन्हा बॉम्बहल्ला करावा लागू शकतो.
शांतता चर्चेत अनेक मुद्द्यांवर मतभेद
अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता चर्चेत आर्थिक निर्बंध हटवणे, इराणचा अणुकार्यक्रम आणि सागरी सुरक्षा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद झाले आणि ते कायम आहेत. या वादामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मार्ग सुरक्षित आणि खुला असल्याचा अमेरिकेचा दावा आहे, परंतु दबाव वाढत राहिल्यास तो बंद किंवा प्रतिबंधित केला जाऊ शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. Donald Trump On Iran War
जहाजवाहतूक रोखण्यासाठी इराणच्या बंदरांवर नौदल नाकेबंदी लादल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, अनेक जहाजे परत पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, इराणने या कृतीला बेकायदेशीर आणि चिथावणीखोर म्हटले आहे. इराणी नेत्यांचे म्हणणे आहे की, जर ही नाकेबंदी सुरूच राहिली, तर त्याचा परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर होईल आणि त्यामुळे जगभरातील बाजारपेठांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी चांगली बातमी सांगितली
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणबाबत चांगली बातमी असल्याचे ट्रम्प म्हणाले, पण त्यांनी याबाबत अधिक तपशील दिला नाही. एअर फोर्स वनमधून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आम्हाला २० मिनिटांपूर्वी एक चांगली बातमी मिळाली आहे आणि असे दिसते की, मध्य पूर्वेतील इराणसोबतची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली चालली आहे. तुम्हाला त्याबद्दल कळेल. मला वाटते की ते घडायला हवे…
#WATCH | US President Donald Trump gaggles with Press on Air Force One En Route Joint Base Andrews.
He says, "We had some pretty good news 20 minutes ago, but it seems to be going very well in the Middle East with Iran. We are negotiating over the weekend. And as you know, we… pic.twitter.com/CU7y1qUZbf
— ANI (@ANI) April 18, 2026