मोठा दिलासा! सौदी अरेबिया अशियासाठी कच्च्या तेलाच्या किंमती करणार कमी; भारतात पेट्रोल-डिझेल दर कमी होणार?

Saudi Arabia crude oil prices सौदी अरेबियाने अशियाई देशांमध्ये केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट करण्याचा निर्णय

Saudi Arabia Crude Oil Prices

Big relief Saudi Arabia to lower crude oil prices for Asia; will petrol and diesel rates drop in India : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल बाजारात निर्माण झालेल्या ताणावपूर्ण वातावरणामध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्याचा फायदा भारताला देखील होणार आहे. सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू असल्याने एकीकडे जागतिक तेल बाजारात स्थिरता येत आहे. तर दुसरीकडे आता सौदी अरेबियाने तेल निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवरील बंदी हटवली; केंद्र सरकारचा आदेश दिल्ली हायकोर्टाकडून रद्द

इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू असल्याने एकीकडे जागतिक तेल बाजारात स्थिरता येत असतानाच आता सौदी अरेबियाने अशियाई देशांमध्ये केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या किंमती जवळपास 26 वर्षांनंतर एवढ्या कमी झाल्या आहेत. ज्याचा फायदा भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांना होणार आहे.

90 हजार पगार असलेला पुण्यातील तरूण कसा अडकला 15 लाखांच्या कर्जात?

या किंमती कमी झाल्यास भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यास मदत होऊ शकते. तर ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार सौदीची राष्ट्रीय ऑईल कंपनी सौदी अॅरामकोने अशियाई देशांमध्ये केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ऑगस्टपासून प्रति बॅरल 11 डॉलर्सची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या शिफारसी

यामध्ये या कंपनीच्या अरब लाईट क्रुड ऑईलची किंमत प्रति बॅरल 1.10 अमेरिकन डॉलर्सने कमी केली आहे. त्यामुळे हे तेल आता प्रादेशिक बेंचमार्कच्या तूलनेत प्रति बॅरल 1.50 अमेरिकन डॉलर्सच्या प्रीमियमवर उपलब्ध झाले आहे. याचा पायदा भारताला होऊ शकतो. कारण भारत हा सर्वात जास्त तेल आयात ही सौदी अरेबियावरून करतो. त्यामुळे या कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्याचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना आणि पर्यायाने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.

जगातील महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस मुंबईत कोसळला ; धडकी भरविणारा रिपोर्ट कुणाचा ?

दुसरीकडे जूनच्या मध्यपर्यंत जागतिक तेल बाजारात तेलाच्या किंमती आणि पूरवठ्यावर परिणाम कायम होता. त्यामध्ये बेंट क्रुड ऑईल हे प्रति बॅरल 72 अमेरिकन डॉलर्स या दरावर होते. जे फेब्रुवारीत युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच्या दराच्या जवळपास पोहचले आहेत. इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमी झाल्याचे हे परिणाम आहेत.

फ्रेमच्या दिग्दर्शकांनी शेअर केल्या खास गोष्टी! चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

इराण आणि अमेरिकेतील संघर्षाच्या काळात या महत्त्वाच्या जलमार्गातील अडथळ्यांमुळे Saudi Aramco ला आपल्या तेलाच्या खेपा लाल समुद्रावरील यानबू बंदराच्या मार्गाने वळवाव्या लागल्या होत्या. यामुळे वाहतूक खर्चात लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर सौदी अॅरामकोने रास तनुरा (Ras Tanura) बंदरातून कच्च्या तेलाच्या निर्यातीचा वेग वाढवला आहे. सध्या येथून होणारी निर्यात संघर्षापूर्वीच्या पातळीच्या सुमारे 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पुरवठा सुधारल्यामुळे कमी किमतीत कच्चे तेल उपलब्ध करून घेण्याचे पर्यायही वाढले आहेत.

ओपेक+कडून उत्पादन वाढवण्याचा निर्णय

जागतिक तेलबाजारासाठी आणखी एक सकारात्मक घडामोड म्हणजे सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखालील OPEC+ या तेल उत्पादक देशांच्या समूहाने ऑगस्ट महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या उत्पादन कोट्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसह अनेक देश वाढीव उत्पादन क्षमतेचा वापर करून कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा अधिक मजबूत होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

follow us