एपस्टीन फाईल्स प्रकरणात नॉर्वेत पहिला बडा मासा अडकला; माजी पंतप्रधानांच्या घरावर छापेमारी

एपस्टिन फाईल्स प्रकरणात अनेक राजकीय नेते, बडे उद्योगपती, प्रभावशाली व्यक्ती, अर्थक्षेत्रातील दादा माणसांचे खरे चेहरे समोर आले आहेत.

  • Written By: Published:
एपस्टीन फाईल्स प्रकरणात नॉर्वेत पहिला बडा मासा अडकला; माजी पंतप्रधानांच्या घरावर छापेमारी

जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फाईल्समुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असताना. या सर्व प्रकणात नॉर्वेचे माजी पंतप्रधान थॉरब्यर्न जॅगलँड यांच्या घरावर छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. थॉरब्यर्न जॅगलँड यांच्यावर गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्याचा तसेच त्यांचा जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. थॉरब्यर्न जॅगलँड यांच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारी पोलिसांच्या हाती काय लागलं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

थॉरब्यर्न जॅगलँड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

जगलँड 1996 ते 1997 या काळात नॉर्वेचे पंतप्रधान होते. या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांनी पदावर असताना एपस्टीनकडून महागड्या भेटवस्तू, प्रवास खर्च व काही पैसे उसने घेतल्याचा आरोप आहे. जगलँड यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री व ‘काउन्सिल ऑफ युरोप’चे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले असून, एपस्टीबाबतचे त्यांच्यावर केलेले आरोप जगलँड आरोप फेटाळले आहेत.

एपस्टिन फाईल्समध्ये क्लिंटन, मायकल जॅक्सनसह अनेकांचे फोटो

एपस्टिन फाईल्स प्रकरणात अनेक राजकीय नेते, बडे उद्योगपती, प्रभावशाली व्यक्ती, अर्थक्षेत्रातील दादा माणसांचे खरे चेहरे समोर आले आहेत. या फाईल्समधील फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, काही देशांचे राजदूत, खासदार, राजपूत्र, यांचा समावेश आहे. एपस्टीन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकदम खास मित्र होते. पण या फाईल्समधून ट्रम्प यांचे नाव वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. या गुंत्यातून पाय मोकळा करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न उघड झाला आहे. त्यामुळे आता सर्वच फाईल उघडा आणि त्यातील सत्यता बाहेर येऊ द्या अशी मागणी ट्रम्प समर्थकांनी केली आहे.

फोटोत काय काय?

एका फोटोमध्ये बिल क्लिंटन घिसलेन मॅक्सवेलसोबत स्विमिंग पुलमध्ये दिसत आहेत. तर एका दुसऱ्या फोटोत क्लिंटन मायकल जॅक्सनसोबत आहे. प्रसिद्ध गायिका डायना रॉसही तिथे उपस्थित असल्याचे दिसून येते.क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने या घडामोडींवर मत व्यक्त केलं आहे. चौकशी क्लिंटनविरोधात झालेली नाही. ही सर्व फोटो 20 वर्षांपूर्वीची आहेत. त्यात काही मोठे नाही. सार्वजनिक जीवनात अनेकांसोबत त्यांची छायाचित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे.

 

follow us