Urmila Matondkar : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

Urmila Matondkar : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

जम्मू काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( bharat jodo ) सध्या जम्मू  काश्मीरमध्ये येऊन पोहोचली आहे. या यात्रेच्या दरम्यान अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) सुद्धा सहभागी होणार आहेत.

उर्मिला मातोंडकर हिने उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत लढविली होती. पण, तिचा त्या निवडणुकीत पराभव झाला. यानतर तिने शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. यामध्ये उर्मिला मातोंडकर हिचे नाव होते. मात्र, ही यादी राज्यपालांनी मजूर केली नाही, त्यामुळे या अभिनेत्रीची आमदारकी थोडक्यात हुकली होती.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील नुकतीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. यानंतर आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. ही माहिती तिने ट्विट करून दिली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. यानंतर आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील  भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube