प्रवासी मतदारांसाठी आनंदाची बातमी, असं करा मतदान

प्रवासी मतदारांसाठी आनंदाची बातमी, असं करा मतदान

नवी दिल्ली : प्रवासी मतदारांना प्रवासादरम्यान मतदान करण्यासाठी आता निवडणूक आयोगाने प्रवासी मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे प्रोटोटाइप विकसित केले आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटीस ही जारी करण्यात आली आहे. तर 16 जानेवारीला राजकीय पक्षांना या मशीनच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीने हे मशीन तयार केले आहे. तर हे मशीन मल्टी कॉंन्स्टीट्यूएंसी रिमोट ईवीएम एका जागेहुन 72 मतदार संघात काम करू शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणूकी प्रति तरूण आणि शहरी नागरिकांची उदासीनता पाहता निवडणूक आयोगाने प्रवासी मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे प्रोटोटाइप विकसित केले आहे.

या अगोदर मतपत्रिकांद्वारे मतदानाची जटिल आणि किचकट प्रक्रियातून दिलासा देण्यासाठी 1977 मध्ये निवडणूक आयोगाने हैदराबादेतील इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआईएल) ला मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बनवण्याची जबाबदारी दिली. संस्थानने भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, बंगलुरुच्या मदतीने 1979 मध्ये याचा प्रोटोटाइप विकसित केला आणि निवडणूक आयोगाने 1980 मध्ये राजकीय पक्षांना या मशीनच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube