UK : तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही; भारताने ठणकावले

UK : तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही; भारताने ठणकावले

लंडन येथे भारतीय उच्च आयोगाने खलिस्तानवाद्यांना जोरदार उत्तर दिले आहे. काही कट्टरपंथी खलिस्तानवाद्यांनी रविवारी लंडन येथील भारतीय उच्चायोगावरील तिरंगा झेंडा काढण्याचा प्रयत्न केला होता. याघटनेनंतर भारत सरकारने दिल्ली येथील ब्रिटनच्या गव्हर्नर यांना याची माहिती दिली होती. यानंतर लंडन येथील भारतीय उच्च आयोगाची खिडकी तोडण्याच्या आरोपाखाली एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणानंतर भारतीय उच्च आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कट्टरपंथीयांच्या हल्ला मोडून काढला आहे. उच्च आयोगावर तिरंगा अभिमानाने फडकत आहे, असे ते म्हणाले आहेत.  तसेच मेट्रोपॉलिटन पोलिसांनी देखील या प्रकरणाची माहिती दिली आहे. याप्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात कुणालाही जखम झाली नसून उच्च आयोगाच्या खिडक्या तोडण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पण पोलिस यायच्या आधीच ते लोक गायब झाले होते, असे तेथील पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. यानंतर तेथील तुटलेल्या खिडक्या व भारतीय उच्च आयोगाच्या इमारतीवर चढणाऱ्या लोकांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

ममता बॅनर्जींनी राहुल गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा पलटवार; म्हणाले, मोदींना खुश करण्यासाठी…

यानंतर भारताने ब्रिटिश सरकारला आपली नाराजी कळवली आहे. तसेच त्यांना आपला विरोध दर्शवला असून भारतीय उच्च आगोगाच्या परिसरात अपुरी सुरक्षा ठेवल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटिश सरकारने याचे उत्तर द्यावे की, जर भारतीय उच्चआयोगाजवळ या पद्धतीने काम चालू होते तर तेव्हा बेजाबदारपणा का दाखवण्यात आला, असे भारत सरकारने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube