Download App

सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताचे ‘ऑपरेशन कावेरी’

Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सांगितले की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदान बंदरात पोहोचले आहेत.

जयशंकर यांनी ट्विट केले की, सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी चालवले जात आहे. सुमारे 500 भारतीय सुदान बंदरात पोहोचले आहेत. अजून बरेच भारतीय मार्गावर आहेत. त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारताची जहाजे आणि विमाने सज्ज आहेत. सुदानमधील आपल्या सर्व बांधवांना मदत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

भारतीय सर्कसचे जनक जेमिनी शंकरन यांचं निधन

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाची दोन सी-130 विमाने आणि नौदलाचे आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानला पोहोचले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हवाई दलाची जहाजे तैनात आहेत, तर आयएनएस सुमेधा सुदानच्या बंदरात पोहोचली आहे.

सुदानमध्ये गृहयुद्ध का सुरु आहे?
सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. लष्कराविरुद्ध युद्ध करणाऱ्या निमलष्करी दलाला येथे रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) म्हणून ओळखले जाते. लष्कर आणि आरएसएफ यांच्यात सुरू झालेल्या युद्धात येथील सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राजधानी खार्तूममध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. येथे विमानतळ, स्टेशनसह सर्व महत्त्वाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी लढा सुरू आहे.

भारतीयांना बाहेर काढणे कठीण का आहे?
सुदानमध्ये सुमारे 4 हजार भारतीय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश भारतीय चार शहरांमध्ये स्थायिक आहेत. यापैकी एक ओमदुरमन, दुसरा कसाला, तिसरा गेदारेफ किंवा अल कादरिफ, तर चौथ्या शहराचे नाव वड मदनी आहे.

यापैकी दोन शहरांचे अंतर राजधानी खार्तूमपासून 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर एका शहराचे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. एक शहर राजधानीला लागून आहे आणि खार्तूमपासून त्याचे अंतर फक्त 25 किमी आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या चार शहरांपैकी एकाही शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही.

मोहम्मद सिराजने रागाच्या भरात केली शिवीगाळ, ‘त्यानंतर घडले असे कृत्य की…’

सुदानमध्ये फक्त दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. एक राजधानी खार्तूममध्ये आहे आणि दुसरे बंदर सुदानमध्ये आहे. मात्र, हवाई हल्ल्याच्या वेळी इथून लोकांना बाहेर काढणेही अवघड असते. जेव्हा युद्धविराम असेल तेव्हाच हे शक्य आहे.

Tags

follow us