Asean-India Summit : आजचं युग युद्धाचं नाही; पंतप्रधान मोदींचा चीनवर हल्लाबोल
PM Modi In Asean-India Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सकाळी इंडोनेशियामधील जकार्ता कन्व्हेक्शन सेंटरमध्ये आयोजित आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमणाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. मोदी म्हणाले की, आजचे युग युद्धाचे नाही. संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग आहे. भारताचा असा विश्वास आहे की, दक्षिण चीन समुद्रासाठी आचारसंहिता प्रभावी असावी.
दिव्यांगांच्या निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास बेमुदत उपोषण; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
यापूर्वी चीनने मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससारख्या अनेक आसियान सदस्य देशांना चीनच्या नकाशावर दाखवले आहे. 28 ऑगस्टला चीनने त्यांचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला. चीनच्या नव्या नकाशामध्ये त्यांनी तैवान, दक्षिण चीन समुद्र, अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला आपला वाटा असल्याचे सांगितले आहे. भारताने चीनचा हा दावा फेटाळून त्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे.
Maratha Reservation : अध्यादेश निघाला पण बीडमध्ये आरक्षणाची धग कायम; एसटी बसच जाळली
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि समृद्धी या क्षेत्रातील सर्व देशांचे हित असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. मोदी म्हणाले की, इंडो-पॅसिफिक ही काळाची गरज आहे, जिथे UNCLOS (युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी) यासह आंतरराष्ट्रीय कायदा सर्व देशांना समान रीतीने लागू होतो.
मोदी म्हणाले, आजचे युग युद्धाचे नाही. संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग आहे. भारताचा असा विश्वास आहे की, दक्षिण चीन समुद्रासाठी आचारसंहिता प्रभावी असावी, UNCLOS शी सुसंगत असावी आणि येथे चर्चेचा भाग नसलेल्या देशांचे हितही विचारात घेतले पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचा इतिहास आणि भूगोल हा भारत आणि आसियान यांना एकत्र आणतो. आसियान हा भारताच्या कायदा पूर्व धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ आहे. भारत हा आसियान-भारतकेंद्रीत आणि इंडो-पॅसिफिक याविषयी आसियानच्या दृष्टीकोनाला समर्थन देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या आमंत्रणावर 20 व्या आसियान-भारत शिखर संमेलन आणि आसियानचे विद्यमान अध्यक्ष म्हणून इंडोनेशियाने आयोजित केलेल्या 18 व्या पूर्व आशिया शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत.