इराणचा अमेरिकेच्या युद्धनौका अब्राहम लिंकनवर हल्ला’; चार क्षेपणास्त्र डागले

Iran–US–Israel war-आखाताच्या समुद्रामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेवर इराणने चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे

  • Written By: Published:
Iran Attack On America Aircraft Carrier

Iran–US–Israel war: अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी, लष्करप्रमुख यांच्यासह काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आखाताच्या समुद्रामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या युद्धनौकेवर इराणने चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. इराणमधील माध्यमांनी असे वृत्त दिले आहे.

यावरून अमेरिका, इस्रायल आणि इराणचे युद्ध नव्या वळणावर आले आहे. आता जमिनीवर आणि समुद्रामध्ये एकमेंकावर हल्ले सुरू केले केले आहे. इराणच्या लष्कराने अमेरिका, इस्रायलविरोधात ऑपरेशन टू प्रॉमिस 4 सुरू केले आहे. या ऑपरेशनमधून अमेरिका-इस्रायलच्या लक्ष्यांवर हल्ले केले जात आहे. अमेरिकन सैन्याची युद्धनौका अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने आता जोरदार प्रत्युत्तर सुरू केले आहे.

अमेरिका-इस्रायलकडून पुन्हा तेहरानवर निशाणा
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या काही शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. रविवारी पुन्हा इराणची राजधानी तेहरानवर सात क्षेपणास्त्र डागले आहेत. हे क्षेपणास्त्र रहिवासी इमारतीवर पडले आहेत. या हल्ल्यात दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

यूएईचा इराणला इशारा
इराणने इस्त्रायलवर हल्ला करताना काही आखातातील देशांवर हल्ला केला आहे. यूएईमधील दुबई आणि अबुधाबी या शहरांवर हल्ले केले आहेत. त्यावरून यूएईनेही इराणला इशारा देताना तुमच्या शेजारांबरोबर लढाई नाही, असं म्हटलं आहे.

follow us