Iran Vs America युद्ध भडकणार; जिवंत रहायचं असेल तर 48 तासांत देश सोडा! अमेरिकेने थेट हुकूमच दिला…
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराकस्थित अमेरिकन नागरिकांना पुढील 48 तासांत देश सोडण्याचा आदेश अमेरिकन दुतावासाकडून देण्यात आला आहे.
Iran-America War : गेल्या एक महिन्यांपासून सुरु असलेल्या इराण आणि अमेरिकेचं (Iran-America War) युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच भयंकर होत असल्याचं चित्र आहे. अशातच आता अमेरिका अधिकच घातक हल्ले करणार असल्याची धमकीही देण्यात आलीयं. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन दुतावासाकडून मोठा आदेश देण्यात आलायं. इराकस्थित अमेरिकन नागरिकांना 48 तासांच्या आत इराक देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दिवसांत लवकरच काहीतरी मोठं भयंकर घडणार असल्याची परिस्थिती निर्माण झालीयं.
रिक्षा संघटनेने इशारा देताच प्रशासन एक्शन मोडवर…गॅस दरवाढ करणाऱ्यांवर कारवाईचा दिला इशारा
इराकच्या बगदादमध्ये इराणला समर्थन देणारे काही दहशतवादी गट आहेत. दोनच दिवसांपूर्वी इराकमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाले. बगदाद हे इराकचे महत्वाचे शहर असून अनेक अमेरिकन नागरिक या देशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना लवकरात लवकर इराक सोडण्याचे आदेश अमेरिकन दुतावासाकडून देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या या आदेशानंतर जगभरातील सर्वच देश आता अलर्ट झाले असून कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, असं भाकित केलं जात आहे.
जर युद्ध वाढल्यास अमेरिकन नागरिकांना टार्गेट केलं जाऊ शकतं, असा अंदाज आहे. त्यामुळेच अमेरिकेने मध्य पूर्वेतील स्थितीवर काही आदेश जारी केले आहेत. अशातच इराक सोडण्याचा आदेश दिल्याने जगभरात एकच खळबळ उडालीयं. नागरिकांना अवघ्या काही तासांचा वेळ दिल्याने लवकरात लवकर नागरिकांनी देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मर्दानी 3’ ओटीटीवरही सुपरहिट; नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1, फ्रेंचायझीतील तिन्ही चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड!
दरम्यान, अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले केले जात आहे. तर दुसरीकडे इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. या युद्धाचे सर्वत्रच जगभरात परिणाम होत असल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेने काढलेल्या या आदेशानंतर आता युद्ध अधिक भडकणार की शमवणार? हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे.