बांग्लादेशात भीषण आग; 2900 दुकाने जळून खाक
ढाका : बांग्लादेशची (Bangladesh)राजधानी ढाकामधील (Dhaka) प्रसिद्ध बंगाबाजारमध्ये (Bangabazar)आज (दि.4) भीषण आग (A terrible fire)लागली. या आगीत (Fire)6 मार्केट आले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 900 दुकाने आगीत आले आहेत. ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन सेवा (Fire Service) आणि नागरी संरक्षणाच्या 48 तुकड्या कार्यरत आहेत. आत्तापर्यंत या आगीमध्ये आठजण होरपळले आहेत. सकाळी 6 च्या दरम्यान अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाले. आगीचा आवाका वाढल्याचं पाहून लष्कर(Army), नौदल (Navy)आणि हवाई दलालाही (air force)कामाला लावण्यात आलं.
Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना घाबरले का?
ढाकामधील एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार आग वाढत असल्याचं पाहून व्यापाऱ्यांनी आपला माल आगीतून वाजवण्यासाठी आगीचीही तमा बाळगली नाही. आपल्या जीवाची आणि धुराची पर्वा न करता आगीतून आपल्या दुकानातील सामान बाहेर काढत होते. त्यानंतरही अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळालेल्या दुकानांमध्ये बहुतेक दुकानं ही कपड्याची आहेत. त्यामुळे आग वेगानं पसरली.
आग लागण्याचं कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही. या आगीमध्ये दुकानं जळाल्यानंतर अनेक व्यापारी रस्त्यावर आले आहेत. मिळालेली माहितीनुसार येथील अग्निशमन दलाने या व्यापाऱ्यांना यापूर्वीच याबद्दल सावध केलं होतं. त्यासाठी अनेकदा पत्रही पाठवले होते.
हे शॉपिंग कॉम्प्लेक्स अजिबात सुरक्षित नसल्याचं यापूर्वीच सांगितलं होतं. या ठिकाणी आगीचा मोठा धोका असल्याचं यापूर्वीच लक्षात आणून दिलं होतं, मात्र व्यापाऱ्यांनी याकडं दुर्लक्ष केलं असल्याची माहिती समोर आली आहे.