रशियाकडून तेल खरेदीवर टॅरिफ नाही, अमेरिकेचा भारताला मोठा दिलासा

Donald Trump Tariffs On India : रशियाकडून तेल खरेदीवर आता टॅरिफ लागणार नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Donald Trump Tariffs On India

Donald Trump Tariffs On India : रशियाकडून तेल खरेदीवर आता टॅरिफ लागणार नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दिलासा दिला आहे. याबाबत ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी 100 टक्के टॅरिफ लागू करण्यासाठी नवीन कायदा आणला होता मात्र हा कायदा लागू होण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठा निर्णय घेत त्यातील अनेक तरतुदींमधून सवलत दिली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि चीनसह अनेक देशांना दिलासा मिळाला आहे.

व्हाईट हाऊसद्वारे जारी केलेल्या आदेशात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “मी काँग्रेसकडे एक प्रमाणपत्र सादर केले आहे, ज्यानुसार सध्याच्या परिस्थितीत अशा सवलती देणे हे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे आहे.” हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा रशियाबाबत ट्रम्प यांची भूमिका मवाळ होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर जाहीरपणे टीका करत आहेत आणि युक्रेनने नवीन नेता निवडून आणण्याची गरज असल्याचेही सुचवत आहेत.

लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026

अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा आणण्यात सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी पुढाकार घेतला होता. सप्टेंबर महिन्यात, ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026 ‘ (Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act of 2026) या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. रशियाकडून (Russia) तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला होता.

या कायद्यातील तरतुदींनुसार, रशियन कच्च्या तेलाची किंवा गॅसची सर्वाधिक आयात करणाऱ्या पाच देशांतून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 30 दिवसांच्या आत 100 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकले असते. हा नियम अशा देशांनाही लागू होऊ शकला असता, ज्यांनी कायदा लागू झाल्यानंतर 30  दिवसांनंतरही जाणूनबुजून रशियाकडून तेल किंवा गॅस खरेदी करणे सुरू ठेवले असते. याव्यतिरिक्त, रशियाला हे निर्बंध टाळण्यास मदत करणाऱ्या पाच प्रमुख देशांवरही हे उपाय लागू केले जाऊ शकले असते. रशियाकडून सर्वाधिक प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये चीन, भारत, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकिया यांचा समावेश आहे.

विधिमंडळातील अभ्यागत प्रवेशावरून पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष; सचिन अहिर, अण्णा बनसोडे यांच्या अधिकारांना कात्री?-

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचा उल्लेख करत शुक्रवारी व्हाईट हाऊसद्वारे जारी करण्यात आलेल्या एका आदेशात,नमूद केले की, त्यांनी अमेरिकन काँग्रेसला कळवले आहे की सध्याच्या घडीला काही सवलती देणे हे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे आहे. या निर्णयाद्वारे, ट्रम्प यांनी कायद्यानुसार लागू होण्यापूर्वीच अनेक निर्बंध आणि शुल्क (टॅरिफ) रद्द केले आहेत. मात्र, उपलब्ध निवेदनात नेमके कोणते निर्बंध आणि शुल्क माफ करण्यात आले आहेत, याचा स्पष्ट उल्लेख नाही.

follow us