उत्तराखंडच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून इस्रोने जोशीमठची छायाचित्रे वेबसाइटवरून हटवली, म्हणाले- भीती पसरवली…
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उत्तराखंड सरकारचे मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या आदेशानुसार जोशीमठ भूस्खलनाची उपग्रह प्रतिमा हटवण्यात आली आहेत. डॉ. रावत हे चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असून, सध्या जोशीमठ येथे आहेत.
मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी सांगितले की, जोशीमठ कोसळल्याबद्दल इस्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि टीव्ही चॅनेलवर त्यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर जोशीमठ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी इस्रोच्या संचालकांशी फोनवर चर्चा केली. त्यांना विनंती केली की, इस्रोने छायाचित्रांबाबत अधिकृत निवेदन जारी करावे किंवा तसे काही नसेल तर वेबसाइटवरून छायाचित्रे काढून टाकावीत.
डॉ. रावत यांच्या म्हणण्यानुसार, इस्रोने आता त्यांच्या विनंतीवरून ही छायाचित्रे वेबसाइटवरून हटवली आहेत. जोशीमठ भूस्खलनाबाबत इस्रोकडून अहवाल जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये 12 दिवसांत जोशीमठची जमीन 5.4 सेमी बुडाल्याचे सांगण्यात आले होते. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने ही उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली आहे.
इस्रोने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये दिसून आले आहे की, जोशीमठ शहर 27 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 5.4 सेमी बुडाले आहे. 12 दिवसांत शहर 5.4 सेंटीमीटरने खाली गेले आहे. इस्रोच्या अहवालात जोशीमठमधील आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरालाही याचा फटका बसला आहे. जोशीमठ-औली रस्त्यालगत 2180 मीटर उंचीवर कोसळण्याचा केंद्रबिंदू आहे.
उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री, धनसिंग रावत यांनी सांगितले की त्यांनी NRSC-ISRO च्या संचालकांशी बैठक झाली आहे. यावेळी ते असा अहवाल कसा जारी करू शकतात, अशी विचारणा करण्यात आली आहे.