ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी, म्हणाले…

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी, म्हणाले…

नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. यातून ऋषभ वाचला मात्र त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ऋषभच्या प्रकृतीबाबत मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. त्यानुसार पंतला सर्वाधिक जखमा डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्याचा रिपोर्ट नॉर्मल आहे. ऋषभच्या गुडघ्याला आणि मनगटाला दुखापत झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. पाठीलाही दुखापत आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, ऋषभच्या अजून काही चाचण्या केल्या जातील. त्याच्या घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय स्कॅनही करायचा होता. परंतू सूज असल्याने एमआरआय स्कॅन टाळण्यात आला आहे. पंतला तिथे जास्त दुखतही आहे. हे स्कॅन आज 31 डिसेंबरला केले जाईल.

कार अपघातात ऋषभच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. अनेक जखमा, कापल्या गेल्याचे व्रण आणि काही ओरखडेही आले. आता त्यांना दुरुस्त करण्यासाठी पंतची प्लास्टिक सर्जरी केली गेली आहे. पंतला उजवा गुडघा आणि घोट्यात लिगामेंटची समस्या असू शकते. याच कारणामुळे मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पंतच्या गुडघ्यावरही पट्टी बांधली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube