डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पहिला फोटो समोर
Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील 'कॉरेस्पॉन्डंट्स डिनर' कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील ‘कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नातील हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची पूर्णपणे ओळख पटली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्या सोशल मीडियावर या हल्लेखोराचा फोटो व्हायरल केला आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘कोल थॉमस ॲलन’ असे आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला हा संशयित, कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचे सांगितले जात असून त्याचे वय 31 वर्षे असल्याचे समजते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचा हल्लेखोर हा नोंदणीकृत ‘डेमोक्रॅट’ आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डन्ट्स डिनर’ (White House Correspondents Dinner) दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या या संशयिताकडे ‘शॉटगन’ आणि ‘हँडगन’ (पिस्तूल) या दोन्ही प्रकारची शस्त्रे आढळून आली.
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेच्या वेळेनुसार, शनिवारी रात्री 8.45 वाजता वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील ‘कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घटनास्थळावरून सुखरूप बाहेर काढले आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, सध्या तरी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील उपस्थित होते.
व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर दरम्यान गोळीबार; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, जेव्हा गोळीबाराचे आवाज ऐकू आले, तेव्हा सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित एखादे जेवणाचे ताट (ट्रे) खाली पडले असावे कारण तो आवाज बऱ्याच अंतरावरून येत असल्याचे भासत होते. पण ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी तो आवाज गोळीबाराचाच असल्याचे तात्काळ ओळखले. मला वाटते की नक्की काय घडले आहे, हे तिला (मेलानियाला) त्याच क्षणी समजले होते. यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना उद्देशून म्हटले होते, हा काही चांगला आवाज नाहीये. तर दुसरीकडे हल्लेखोराचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही परंतु त्यांच्या मते, ती व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतरही अत्यंत धोकादायक वाटत होती अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली.