मोठी बातमी : इराण-इस्रायल संघर्षात येमेनेच्या हूथी बंडखोरांची एन्ट्री

Iran-Israel war- युद्धाला एक महिना झाल्यानंतर येमेनच्या दहशतवादी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे इस्रायल व इराण तसेच त्यांच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांमध्ये लढाई तीव्र होत आहे

  • Written By: Published:
Iran Israel War

Yemen’s Houthis enter Iran-Israel war : इराण-इस्रायल (Iran-Israel war) व अमेरिका युद्ध सुरू होऊन एक महिना होत आला आहे. दोन्ही बाजूने हल्ले सुरू झाले आहेत. त्यात इराणच्या ताब्यात असलेल्या हॉर्माझ सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जगभरात इंधन संकट निर्माण झाले आहे. त्यात आता येमेनेच्या हूथी बंडखोरांनी (Yemen’s Houthis) युद्धात उडी घेतलीय. हूथी बंडखोरांनी इस्रायलवर हवाई हल्ला केलाय. त्यामुळे हे युद्ध एका नव्या वळणावर आले आहे.


गुप्त ऑपरेशनचा थरार! रात्रीच्या अंधारात आखलेल्या ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा खरातला पोलिसांनी कसा गाठलं?

युद्धाला एक महिना झाल्यानंतर येमेनच्या दहशतवादी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे इस्रायल व इराण तसेच त्यांच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांमध्ये लढाई तीव्र होत आहे. हूथी बंडखोरांच्या प्रवेशामुळे युद्ध आणखी वाढू शकते. तांबड्या समुद्रातील महत्त्वाचे सागरी मार्ग या संकटात ओढले गेले तर जगावर त्याचे परिणाम होणार आहे.

हूथी लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी अल-मसिराह दूरचित्रवाणीवर या कारवाईची घोषणा केलीय. दक्षिण इस्रायलमधील “संवेदनशील इस्रायली लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा हूथी संघटनेने केलाय. त्यांनी इशारा दिला की, जोपर्यंत या प्रदेशातील मित्र राष्ट्रांच्या गटांविरुद्धची ‘आक्रमकता’ संपत नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहील. इराण आणि हिजबुल्लाह यांनी रात्रभर हल्ले सुरू ठेवल्याने, बेअरशेबा आणि इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांजवळ हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. तर तेल अवीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की ते अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यांना प्रतिसाद देत आहेत.


हूथींचा सहभागामुळे नवे संकट

या गटाने यापूर्वी गाझा युद्धादरम्यान इस्रायलला लक्ष्य केले होते. तांबड्या समुद्रातील जहाजांवर हल्ले केला होते. ज्यामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरच्या मालाची वाहतूक होणारा मार्ग विस्कळीत झाला होता. त्यामुळे आता आणखी संघर्ष वाढवण्याचे संकेत आहे. ज्यात इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य केले जाईल, तसेच अल-मंडेब सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याचा जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हुथींनी हा हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने अलीकडेच युरेनियम प्रक्रिया आणि जड पाण्याच्या उत्पादनाशी संबंधित ठिकाणांसह, अणुऊर्जेवर हल्ले केले आहे. तेहरानने प्रत्युत्तर देत प्रादेशिक लष्करी तळांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे.


सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ले

सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावरही इराणकडून वारंवार हल्ले होत आहे. ज्यात गेल्या आठवड्यात दोन डझनांहून अधिक अमेरिकन कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने अनेक टप्प्यांत तळावर हल्ले केले, ज्यामुळे विमाने आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य आणि हिजबुल्ला यांच्यातील लढाई तीव्र झालीय. युद्ध सुरू झाल्यापासून शेकडो लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. तेल अवीवसह इस्रायली शहरांना वारंवार क्षेपणास्त्र हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.

follow us