रिचार्जमध्ये ग्राहकांना दिलासा, राघव चड्ढांच्या मागणीनंतर आता 28 ऐवजी 30 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने टेलिकॉम कन्झ्युमर्स प्रोटेक्शन (13 वि सुधारणा) रेग्युलेशन्स, 2026 जारी केले आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 27T172647.109

30-day recharge plans instead of 28-day ones : देशभरातील मोबाईल प्रीपेड ग्राहकांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने टेलिकॉम कन्झ्युमर्स प्रोटेक्शन (13 वि सुधारणा) रेग्युलेशन्स, 2026 जारी केले आहेत. या बदलामुळे ग्राहकांना रिचार्ज प्लॅन्स निवडताना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी यापूर्वी संसदेत 28 दिवसांच्या तथाकथित मंथली रिचार्जचा मुद्दा उपस्थित केला होता. 28 दिवसांच्या रिचार्ज सायकलमुळे ग्राहकांना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. मोबाईल रिचार्जची वैधता प्रत्यक्ष कॅलेंडर महिन्याशी सुसंगत असावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेच्या उपलब्ध डेटा-बंडल प्लॅन्सशी संबंधित व्हॉइस आणि एसएमएस ओन्ली पर्याय देखील उपलब्ध करून द्यावे लागतील. तसेच दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू करता येईल, असा पर्याय देण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः मोबाईल डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना अनावश्यक डेटासाठी पैसे खर्च करण्याची गरज कमी होऊ शकते.

कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं वक्तव्य चर्चेत

या बदलामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरानुसार रिचार्ज प्लॅन निवडणे अधिक सोपे होणार आहे. केवळ कॉलिंग आणि एसएमएसची गरज असलेल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाल्याने अनावश्यक सेवांचा खर्व टाळता येऊ शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी ही तरतूद महत्वाची ठरणार आहे. दर महिन्याला त्याच तारखेला रिचार्ज रिन्यू करण्याचा पर्याय मिळाल्याने रिचार्जची तारीख लक्षात ठेवणे देखील सोपे होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना नव्या नियमांनुसार त्यांच्या प्लॅन्समध्ये आवश्यक बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळात कंपन्यांकडून नवीन रिचार्ज पर्याय ग्राहकांसमोर येण्याची शक्यता आहे.

व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्लॅन्स संबंधित डेटा-बंडल प्लॅन्सच्या तुलनेत योग्य दरकपातीसह उपलब्ध करून देण्याची तरतूद नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल डेटाचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या गरजेपुरत्याच सेवांसाठी पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या निर्णयानंतर राघव चड्ढा यांनी सरकार आणि TRAIचे आभार मानले आहेत. नागरिकांनी रिचार्ज प्लॅन्सच्या मर्यादित पर्यायांबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केली होती आणि हा मुद्दा आपण संसदेत मांडला होता, असे त्यांनी सांगितले.

चोरीला गेलेला मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडल्यानंतर त्यावर धोरणात्मक पातळीवर कार्यवाही होणे हा रचनात्मक राजकारणाचा नमुना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. TRAIने 22 सप्टेंबर 2026 रोजी ही 13वी सुधारणा जारी केली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार असून विशेषतः व्हॉइस आणि एसएमएस वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

follow us