कैलास मानसरोवर यात्रेत अडकलेल्या 37 भाविकांना दिलासा; फडणवीसांच्या पुढाकारानंतर काठमांडूकडे रवाना
37 Maharashtra Pilgrims फडणवीसांच्या पुढाकारानंतर तिबेटमध्ये महाराष्ट्रातील 37 कैलास मानसरोवर यात्रेकरू सागाहून काठमांडूकडे सुरक्षित रवाना.
37 Maharashtra Pilgrims Head to Kathmandu After Fadnavis’ Intervention : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेले महाराष्ट्रातील भाविक तिबेटमधील सागा येथे अडकले. महाराष्ट्रातील त्या 37 भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुरक्षित रवाना झाले.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण झाल्यानंतर परतीच्या प्रवासात ते सागा येथे अडकले होते.
पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ANTFची मोठी कारवाई; MD ड्रग्ससह 3 जणांना अटक
या भाविकांचे काठमांडूहून परतीचे विमान 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजित आहे. त्यामुळे त्यांना वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते. भाविक सागा येथे अडकल्याची माहिती समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधून समन्वय केला. परराष्ट्र मंत्रालयानेही आवश्यक मदत आणि सहकार्य केले.
सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद
या प्रयत्नांनंतर अखेर 37 ही भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे. वेळेत काठमांडू गाठून त्यांचे नियोजित विमान पकडता यावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक समन्वय केला जात आहे.
संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार