मोठी बातमी! रायगडमध्ये मंत्री गोगावले तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहन
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबात मोठी बातमी समोर आली आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबात मोठी बातमी समोर आली आहे. उद्याच्या 15 ऑगस्टला नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा मात्र कायम आहे.
गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आजच सुटणार असून, संध्याकाळपर्यंत आपलं नाव जाहीर होईल, असा दावा मंगळवारी (ता. 11) केला होता. त्यानुकारच ही घटना घडली आहे. 15 ऑगस्ट रोजी रायगडचा पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजवंदन करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.
राज्य सरकारने ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर केली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालय येथे सकाळी 8.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. तर पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
यावेळी अद्याप पालकमंत्रिपदाचा तिढा न सुटलेल्या रायगड आणि नाशिकमधील ध्वजारोहणाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहण गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, रायगडमध्ये गोगावले ध्वजारोहण करतील, अशी माहिती समोर आली आहे.
कुठं कोण ध्वजारोहण करणार ?
एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे – ठाणे
श्रीमती सुनैत्रा अजित पवार – बीड
चंद्रशेखर प्रभाकती कृष्णराव बावनकुळे – नागपूर
राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील – अहिल्यानगर
हसन सकिना मियालाल मुश्रीफ – नंदुरबार
चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्छू पाटील – सांगली
गिरीश गिता दत्तात्रय महाजन – नाशिक
गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – पालघर
गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील – जळगाव
दादाजी रेशमाबाई राजू भुसे – अमरावती
संजय प्रमिला दुलीचंद राठोड – यवतमाळ
उदय स्वरूप रवींद्र सामंत – रत्नागिरी
जयकुमार नयनकुंवर जितेंद्रसिंह रावल – धुळे
श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे – जालना
अतुल ललनावती मोरेश्वर सावे – नांदेड
अशोक जनाबाई रामाजी बुडके – चंद्रपूर
शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई – सातारा
आशिष मिन्नल बाबाजी शेलार – मुंबई उपनगर
दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे – वाशिम
शिवेंद्रसिंह अरुणराजे अभयसिंहराजे भोसले – लातूर
जयकुमार कमल भगवानराव गोरे – सोलापूर
नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ – हिंगोली
संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
प्रताप इंद्रसाबाई बाबुराव सरनाईक – धाराशिव
भरत विठाबाई मारुती गोगावले – रायगड
मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) – बुलढाणा
नितेश निलम नारायण राणे – सिंधुदुर्ग
आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर – अकोला
प्रकाश सुशीला आनंदस्राव आबीटकर – कोल्हापूर
आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – गडचिरोली
श्रीमती माधुरी मिरा सतीश मिसाळ – भंडारा
डॉ. पंकज कांचन राजेश भोयर – वर्धा
श्रीमती मेघना दीपक साकारे – बोडीकर – परभणी
इंद्रनील अनिता मनोहर नाईक – गोंदिया