… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या
Manoj Jarange Patil : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलाना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे आज दिल्लीत दाखल झाले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जर पुन्हा लाठी हल्ला केला तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपाल्या मायबापाने यांना मतदान केलय. आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांना मतदान केलय. या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार आणि पुन्हा लाठी हल्ला झाला तर भाजपच्या मंत्र्यांना फिरु देणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला बोलावलं तेव्हा आम्ही दिल्लीला येणार असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.