‘मला नमाज पठण करायचंय…’ विचारलं अन को-पायलटचा हल्ला; कॅप्टन स्मित मच्छारांनी सांगितला थरारक अनुभव

को-पायलटने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 04T105305.520

Captain Smith Machhara shared a thrilling experience : फ्लाय दुबईच्या विमानातील एका धक्कादायक घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत तब्बल 174 प्रवाशांचे प्राण वाचवले. 30 सप्टेंबर रोजी विमानाचे उड्डाण सुरू असताना ओमानच्या को-पायलटने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही मिनिटांतच त्याने कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. मात्र गंभीर जखमी होऊनही मच्छार यांनी हार न मानता विमानावरील नियंत्रण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.

कॅप्टन मच्छार यांच्या माहितीनुसार, विमानाचे उड्डाण सुरुवातीला अगदी सामान्य पद्धतीने सुरू होते. अचानक को-पायलटने प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची विनंती मान्य करत मच्छार यांनी आदर म्हणून आपले लक्ष दुसरीकडे वळवले. मात्र अवघ्या चार-पाच मिनिटांत को-पायलटने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केला. सुरुवातीला विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असे मच्छार यांना वाटले. मात्र हल्ले सुरूच राहिल्यानंतर को-पायलट आपल्यावर जीवघेणा हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने कॅप्टन मच्छार कॉकपिटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची दृष्टीही धूसर झाली होती. त्याचवेळी विमान अतिशय वेगाने खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, अवघ्या दोन मिनिटांत विमान तब्बल 17 हजार फुटांपेक्षा अधिक खाली आले होते. विमानातील प्रवाशांच्या किंचाळ्या आणि बाहेरून येणाऱ्या हवेच्या प्रचंड आवाजामुळे परिस्थिती आणखी भयावह झाली होती.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची गर्जना, गर्जना मोर्च्याच्या माध्यमातून आज राज-उद्धव ठाकरे रस्त्यावर

या गंभीर परिस्थितीत विमानाला दुर्घटनेपासून वाचवण्याची हीच शेवटची संधी असल्याची जाणीव कॅप्टन मच्छार यांना झाली. कॉकपिटच्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेतही त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत आतून बंद असलेला कॉकपिटचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि हल्लेखोर को-पायलटला ताब्यात घेतले. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग सौदी अरेबियातील तबुक येथे करण्यात आले. या धाडसी कृतीमुळे विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचले.

कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सध्या अबू धाबी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयातून त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि त्या भयावह घटनेचा अनुभव सांगितला. नेतन्याहू यांनी मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक करत त्यांना भारत, इस्रायल आणि जगाचा हिरो असल्याचे म्हटले. तसेच इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मशाल प्रज्वलित करण्यासाठी त्यांना विशेष आमंत्रण दिले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन मच्छार यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.

follow us