CJP जेनझीसह पुन्हा दिल्लीत धडकणार; 5 सप्टेंबरला ठरला मोर्चा
CJP to Hold Delhi March CJP कडून सरकारच्या आश्वासनांविरोधात पुन्हा आंदोलनाची घोषणा; 5 सप्टेंबरला जेनझीसह दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार.
CJP to Hold Delhi March on September 5 Over Unfulfilled Promises : पेपरफुटी आणि परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. 25 जुलै रोजी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत CJPने येत्या 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास घेऊन येतोय ‘डोंट बी शाय’; 25 सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर
CJPच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीच्या आंदोलनावेळी केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत काही आश्वासने देण्यात आली होती. त्यामध्ये आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि एफआयआर मागे घेण्याचाही समावेश होता. मात्र, सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय मोर्चा
5 सप्टेंबर रोजी CJP कडून दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
तीन मंत्री अंतरवालीत! मराठा आरक्षणावर झाली चर्चा, आंदोलनाबाबत जरांगे पाटालांची भूमिका काय?
या मोर्चाचे नेतृत्व NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय तसेच पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेले आणि कथित पोलीस अत्याचाराचे पीडित कुटुंबीय करणार असल्याचे CJPने सांगितले आहे. विद्यार्थी, युवा संघटना आणि देशभरातील तरुणांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले आहे.
‘सरकारने एफआयआरची यादी दिली नाही’
CJPने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचाही संदर्भ दिला आहे. पक्षाच्या दाव्यानुसार, 18 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची यादी केंद्र सरकारकडे मागितली होती.
अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी
CJPचा आरोप आहे की, सरकारने अद्याप या एफआयआरची स्पष्ट यादी किंवा त्याबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही. आंदोलन संपण्यापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांपासून सरकार माघार घेत असल्याचे हे संकेत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
CJPचे नेते सौरभ दास आणि रत्ना सिंह यांनी आंदोलनादरम्यान सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले एफआयआर मागे घेण्यात यावेत आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अभिजीत दिपकेंकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियान
दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipake) यांनी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सरकारी शाळांची दुरवस्था पाहून संताप व्यक्त करत CJPने शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरही सरकारला घेरण्याची भूमिका घेतली आहे.
जयपूरमध्ये CJP कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप
‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील रामपुरा-कंवरपुरा गावात CJP कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी या प्रकरणात राजस्थान सरकारने दाखल झालेल्या एफआयआरवर कारवाई करावी आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
त्याचवेळी CJP कार्यकर्त्यांविरोधातही ठोस पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यात 5,086 कोटींचं वाटप
एकीकडे परीक्षांशी संबंधित मुद्दे, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि एफआयआर मागे घेण्याची मागणी, तर दुसरीकडे सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा घेऊन CJPने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनी दिल्लीतील प्रस्तावित मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.