प्रारंभ’च्या माध्यमातून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

D Y Patil College: आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘प्रारंभ’ इंडक्शन कार्यक्रम पार पडला.

D Y Patil College of Architecture Prarambh

D Y Patil College of Architecture Prarambh: आकुर्डी : ​डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्ष बी. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘प्रारंभ’ इंडक्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वास्तुशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात या कार्यक्रमातून झाली.

कार्यक्रमास डॉ. राजेंद्र तलवाररे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे प्रमुख पाहुणे, संदीप महाजन, संचालक व मानव संसाधन विभाग प्रमुख, सार्क विभाग, अस्सा अब्ब्रोह हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, बी. एच. शर्मा, मुख्य वित्त अधिकारी, तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या, डॉ. छाया तिरविर उपस्थित होत्या.

ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

​कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या स्वागत भाषणाने झाली. प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथींनी वास्तुविद्येची समाजातील भूमिका व भावी वास्तुविशारदांच्या जबाबदाऱ्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी शिस्त व महाविद्यालयातील नियमांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास, परीक्षा-संबंधित अनुशासन, महाविद्यालयीन मार्गदर्शन तत्त्वे सांगण्यात आली तसेच महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापकांची ओळख करून देण्यात आली.

दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांची यादी समोर! तुमच्या तालुक्याचं नावं आहे? वाचा सविस्तर…

​या कार्यक्रमास सतेज पाटील, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, आकुर्डी शैक्षणिक संकुल, तेजस पाटील, विश्वस्त, स्नेहा तेजस पाटील संचालक – कार्यप्रणाली, आणि रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, डी. वाय. पाटील एज्युकेशन कॅम्पस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​आनंदी चेहरे, गोड आठवणी आणि प्राध्यापकांच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली.

follow us