Video: माझं काम मुख्यमंत्र्यांना माहिती, राजीनामा घेण्याचा त्यांचा अधिकार, मंत्री झिरवळ काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. बाकी निर्यणयाचे अधिकार त्यांचे आहेतच.

  • Written By: Published:
Zirwall

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन खात्याच्या (Zirwal) कार्यालयातील लिपीक लाच घेताना रंगेहाथ सापडल्यामुळे अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी यांनी आज पत्रकार परिषदेत काही महत्वाचे मु्द्दे आणि खुलासे केले आहेत. ते म्हणाले,12 तारखेला जी काही रेड पडली. त्यात राजू ढेरिंगे या क्लार्कला रंगेहाथ पकडलं. हे असे प्रकार इथे होतात याची सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती असं झिरवळ म्हणाले.

कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय जवळ जरी असलं तरी जवळ जाऊन पाहण्याचा प्रसंग आला नाही. परंतु जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे मी तात्काळ कारवाई केली. राजू ढेरिंगे याची पोलीस कस्टडीत चौकशी सुरु आहे. त्या बरोबर आपल्या विभागामार्फत स्वतंत्र चौकशी नेमली आहे. सहआयुक्त दक्षता,पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा गोपनीय अहवाल मला मिळाल्यानंतर पुढली कारवाई करेन असंही झिरवाळ म्हणाले.

मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द

आपल्याच विभागात फाईल तुमच्यापर्यंत आणून तुमच्याकडून सही करुन घेण्यासाठी लाच घेतली जात होती अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. बळजबरीने फाईल तुमच्यापर्यंत आणल्या जात होत्या का? असं तरी कधी घडलेलं नाही. त्याची प्रक्रिया आहे, सुनावणी वैगेरे घेणं, सुनावणीनतंर स्टे देणं, निलंबनच करणं,अपूर्णतांची पूर्तता झाली कि नाही, ही सर्व रुटीनमधली प्रक्रिया होती.बळजबरीने सही करुन घेणं असं कधी झालं नाही असंसुद्धा ते म्हणाले.

तुमचे ओएसडी, पीएस यांना कल्पना होती असं म्हटलं जातय या प्रश्नावर बातम्या वेगवेगळ्या येतात. मी ऐकतो. राजू ढेरिंगे यांनी असं कुठेही सांगितलेलं नाही. मी माझ्यासाठी घेतले असच त्यांनी सांगितलय असं नरहरी झिरवाळ म्हणाले. सुनेत्रा पवारांशी तुमची भेट झाली. तुमच्यावर नाराजी व्यक्त केली. काय बोलणं झालं?. झाला हा प्रकार न ऐकण्यासारखा, न खपवून घेण्यासारखा आहे. त्या पक्षाच्या प्रमुख आहेत. नाराजी व्यक्त करण्यापेक्षा सूचना केली असं म्हणेन. सखोल चौकशी करण्याची तयारी दर्शवलेली आहे” असं उत्तर झिरवाळ यांनी दिलं.

राजीनाम्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा

कुणी जाणीवपूर्वक असं करतय का? “माझ्याबाबतीत मला एक आत्मविश्वास पक्का आहे. माझी कोणाबरोबर दुश्मनी, वैमनस्य नाही. मुद्दामून कोणी बदनाम करतय असं वाटत नाही असं उत्तर नरहरी झिरवाळ यांनी दिलं. नरहरी झिरवाळ यांचं मंत्रीपद काढून घेण्याची चर्चा होती, त्यासाठी इच्छुक दबाव आणतायत का? “अधिकारी काढणं आणि दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतं. मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. माझ्या स्वपक्षातलं कोणी असं करेल असं वाटत नाही असा दावाही झिरवाळांनी केला आहे.

follow us