ठोकरें कहती हैं मारा जाएगा, पर हौसले कहते हैं देख लेंगे; भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा हुंकार

भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी समर्थकांना उद्देशून केलेल्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 20T151107.056

Pankaja Munde Bhagwangad Rally : भगवान गडावरील दसरा मेळाव्यात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधताना भगवान बाबांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला. (Munde) गोपीनाथ मुंडे यांनी लोकांना दिलेलं प्रेम आणि समर्थकांनी दाखवलेली साथ आपण कधीही विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. भगवान गडावर एक अद्भुत शक्ती असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आभार मानले. शिवधनुष्य उचलण्याचं उदाहरण देत पंकजा मुंडे यांनी पवित्रता आणि सामर्थ्य यांचा संबंध अधोरेखित केला.

दुष्काळाच्या परिस्थितीत दसरा मेळावा कसा होणार, असा प्रश्न काही जण उपस्थित करत होते. मात्र, आपल्या समर्थकांमध्ये संकटांचा सामना करण्याची ताकद असल्याचं सांगत पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यांचे कार्यकर्ते उन्हात आणि डोंगरात काम करणारे वाघ आहेत. ऊन किंवा प्रतिकूल परिस्थिती त्यांना थांबवू शकत नाही. समर्थक हेच आपलं बळ असल्याचं सांगत गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराला मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा कधीही विसरता येणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जो मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला 2029 मध्ये निवडून द्यायचं नाही; मनोज जरांगेंचा इशारा

मेळाव्याच्या आयोजनाबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी निर्णय घेण्यातील धाडसाचाही उल्लेख केला. दुष्काळामुळे कार्यक्रम होऊ शकेल की नाही, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी विजयाच्या जिद्दीचा संदेश देणाऱ्या हिंदी ओळी सांगितल्या. पुढे काय होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा धाडसानं निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भगवान भक्तीगडाची स्थापना हा एका लेकीच्या जिद्दीचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या वारशातून मिळालेल्या शक्तीचा भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं.

समर्थकांच्या मेहनतीचं महत्त्व सांगण्यासाठी पंकजा मुंडे यांनी मधाच्या पोळ्याचं उदाहरण दिलं. मधमाशा जशा कष्ट करून मध गोळा करतात, तसंच आपले कार्यकर्ते आणि समर्थकही मेहनत घेतात, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं, त्यांना स्वाभिमानानं जगता यावं, यासाठी आपण आपलं जीवन त्यांच्यासाठी समर्पित केल्याचं त्यांनी सांगितलं. भगवान गडावरील मेळाव्यातून त्यांनी समर्थकांशी असलेलं नातं, त्यांच्या कष्टांबद्दलची कृतज्ञता आणि पुढील वाटचालीसाठीचा निर्धार व्यक्त केला.

follow us