Fact Check: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘जेन झी’ला तुकाराम मुंढेंचा पाठींबा? व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?

Tukaram Mundhe Supports Gen Z Protesters: DGIPRने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला तुकाराम मुंढेंचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.

Tukaram Mundhe Supports Gen Z Protesters Demanding Gyanesh Kumar’s Resignation

Tukaram Mundhe Supports Gen Z Protesters Demanding Gyanesh Kumar’s Resignation: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (MAHARASHTRA DGIPR) एक्सवरून व्हायरल झालेल्या एका दाव्याचा फॅक्ट चेक केला आहे. @ragebait_krungi या अकाउंटने आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा देत असल्याचा दावा केला होता. हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे DGIPRने स्पष्ट केले आहे.

‘आयएएस व्हा’ असं मी सांगणार नाही, तरुणाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंचं रोखठोक उत्तर, भूमिका केली स्पष्ट

 

DGIPRच्या अधिकृत पोस्टनुसार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना दिसतात. त्यात ते Gen Z ला ‘ऊर्जेचा शक्तिशाली स्रोत’ असे संबोधतात. या व्हिडिओचा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही, असे DGIPR ने स्पष्ट केले आहे.

“शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पाच-पाच हजार फेकले”; संजय राऊतांचा संताप, सरकारला धरलं धारेवर!

देशभरात SIR प्रक्रियेबाबतच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी आंदोलने सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक दिशाभूल करणारे दावे व व्हिडिओ पसरत आहेत. डीजीआयपीआरने या प्रकरणात स्पष्टपणे सांगितले की, मुंढे यांचा संबंधित व्हिडिओ पूर्णपणे वेगळ्या कार्यक्रमातील आहे आणि तो आंदोलनाशी जोडणे चुकीचे आहे.

follow us