Health Update : तुम्ही थेट नळाचं पाणी पित आहात ? हे आहेत धोके

Untitled Design   2023 02 08T182907.392

मुंबई : आपल्याकडे म्हटलं जात की, ‘जल हे जीवन आहे’. पण आपल्या देशात ज्या नळांचं पाणी आपण पितो त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पाणी हे चीवन होण्याऐवजी धोकादायक होत चाललं आहे. पूर्ण देशभरात पाणी प्रदुषण वाढले आहे. पुर्वी आपण थेट नळाचं पाणी पित होतो. पण आता पाणी फिल्टर करावेच लागते.

बाहेर असेल तर आपण बाटलीबंद पाणी पितो. मात्र थेट नळाद्वारे जे पाणी येते ते आपण पिऊ शकत नाही. चला तर जाणून घेऊ थेट नळाचं पाणी प्यायल्याने काय-काय ? धोके असतात.

हेही वाचा : सावधान! ‘या’ पदार्थात असतं नसांना ब्लॉक करणारं कोलेस्ट्रॉल, यामुळेच येतो हृदयविकाराचा झटका

आपल्या देशात प्रत्येक भागात पाणी पूरवठ्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी पाण्यात दूषित बॅक्टेरियांचं प्रमाण जास्त आहे. तसेच त्यामध्ये हेवी मेटल असते. त्यामुळे गंभीर आजारांचा सामना कारावा लागू शकतो. कारण दूषित पाणी प्यायल्याने पोटाचे आजार विशेषतः उद्भवतात. आणि अतर आजारांचं मूळ देखील हे पोटाचे स्वास्थ बिघडणे हेच असते.

त्यामुळे पाणी पिताना एकतर ते फिल्टर केलेले असणे किंवा ते ऊकळून गाळून प्यायल्याने तुम्हाला बॅक्टेरिया विरहित पाणी पिता येईल. जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, भारतात 70% पेक्षा जास्त पाणीसाठा दूषित आहे. जे आरोग्याच्या परिस्थिती ढासळण्याचे एक मोठे कारण ठरू शकते.

बॅक्टेरिया विरहित पाणी पिण्यासाठी भारतात लोक पाणी फिल्टर करून किंवा बाहेर असेल तर आपण बाटलीबंद पाणी पितात पण हे पाणी देखील हानिकारक असू शकते. कारण त्यामध्ये देखील दूषित पदार्थ असू शकतात त्यामुळे हे पाणी देखील चांगल्या ब्रॅन्डचे पिणे गरजेचे असते. खात्र करणे गरजेचे असते की, तुम्ही पिताय ते पाणी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक नाही.

भारत सरकारने ग्रामीण भागाला स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (स्वच्छ भारत मिशन) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासह हा प्रश्न सोडवण्यासाठी हे पहिलं पाऊल उचलंल आहे. या कार्यक्रमांची अंमलबजावणी मात्र आता मंदावली आहे.

Tags

follow us